मधुकर बोबडे यांनी वाढदिवसानिमित्त वरुर रोड येथील वाचनालयाला दिली पुस्तके भेट

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा: माजी मुख्याध्यापक श्री मधुकर बोबडे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत, वाचाल तर वाचाल हा मंत्र अंगी बाळगून आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने जगतगुरू तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय वरुर रोड येथील वाचनालयाला पुस्तके भेट देऊन वाढदिवस साजरा केला. 
   विद्यार्थ्यांना सर्वच प्रकारचे ज्ञान हे पुस्तकातून मिळते, पुस्तके ही प्रत्येक व्यक्तीसाठी अतिशय महत्वाची आहे. कारण पुस्तके ही ज्ञानाचा प्रचंड सागर आहे जी आपल्याला ज्ञान देतात.पुस्तक वाचल्याने आपली बुद्धी विकसित होते. पुस्तके ही प्रत्येक विद्यार्थ्याना योग्य मार्गदर्शन करतात आणि योग्य दिशा दाखविण्याचे काम करतात. म्हणून पुस्तकाचे महत्व लक्षात घेता प्रत्येक विद्यार्थ्यांनी नियमित पुस्तकाचे वाचन केले पाहिजे असे  मधुकर बोबडे यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी विनायक बोबडे, विशाल शेंडे, प्रवीण चौधरी, सागर बोरकर, तेजस वडस्कर, कुणाल भोयर, भाविक वडस्कर, आदित्य निमकर , प्रशिक उमरे इत्यादी वाचनालयातील विद्यार्थी उपस्थित होते.