Top News

सामान्यांचे प्रश्न मांडणारा पत्रकार हरपला; पत्रकार गणपत खोबरे यांचे निधन.

वृत्तांकन करण्याकरिता गेलेल्या पत्रकाराला कोरोनाची लागण झाल्याने गणपत खोबरे यांचा मृत्यू?
Bhairav Diwase. April 16, 2021
चिमूर:- पुण्यनगरी चिमुर तालुका बातमीदार तथा क्रांतिनगरी टाइम्स चे संपादक गणपत खोबरे यांचे काल (गुरुवार) रात्रौ 11 वाजताच्या सुमारास कोरोनाने निधन झाले.  गणपत खोबरे यांच्या निधनामुळे सामान्यांचे प्रश्न मांडणारा पत्रकार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.


शासन, प्रशासन, राजकारण, शहरी भागाचे प्रश्न, सर्वसामान्य व हातावर पोट असणार्‍या कामगारांच्या प्रश्नावर त्यांचा गाढा अभ्यास होता. सचिव चिमुर तालुका पत्रकार संघाचे काम पाहत होते. पत्रकारितेत उत्कृष्ठ कार्य केले. त्यांच्या निधनामुळे तालुक्यात, घरातून, पत्रकारितेमधून आणि समाज बांधवांमधून हळहळ व्यक्त होत आहे.

एक सच्चा प्रामाणिक पत्रकार हरपला. अभ्यासू, सरळ, निर्भीड आणि सच्चा पत्रकार आपल्यातून निघून गेला. ही अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद घटना आहे. गणपत खोबरे हे अभ्यासू अन इतरांपेक्षा वेगळे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या जाण्याने पत्रकारिता क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. हे अकाली संकट झेलण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांस धक्कादायक दुःखद घटना आहे.

पत्रकार गणपत खोबरे यांच्या निधनाने एक उमदा, अभ्यासू पत्रकार काळाने हिरावून नेला आहे. खोबरे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात आधार न्युज नेटवर्कची टिम सहभागी आहे. खोबरे कुटुंबातील कर्ता माणूस अकाली गेल्याने घर उघडे पडले आहे. पुण्यनगरी समूहाने खोबरे कुटुंबाला भरीव आर्थिक मदत केली पाहिजे ...ही खरी श्रद्धांजली ठरेल. आधार न्यूज नेटवर्क परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने