Top News

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत धनराज दुर्योधन प्रथम



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- सर्वांना एकत्रित आणुन एक विचारमंच मिळावे या उद्देशाने युगपुरुष प्रतिष्ठान नेरुळ,नवी मुंबई या संस्थेतर्फे  आॅनलाइन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा दिनांक १ एप्रिल २०२१ ते १२ एप्रिल २०२१ या दरम्यान आयोजित केली होती. या लाॅकडाऊन काळात सर्वांना प्रोत्साहन मिळावे या करिता वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन युगपुरुष प्रतिष्ठानचे संस्थापक मा.अजित खताळ व युगपुरुष प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.निलेश तायडे यांनी आयोजित केली होती. ही स्पर्धा भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर  यांच्या जयंती निमित्य राबविण्यात आली होती. या आॅनलाइन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत संपुर्ण महाराष्ट्रातुन स्पर्धकानी भाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेचा निकाल भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती दिनी जाहिर करण्यात आला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक धनराज रघुनाथ दुर्योधन (जि.चंद्रपूर ) ,द्वितिय क्रमांक समिक्षा नंदकुमार सोनकांबळे (जि.ठाणे ) तर तृतिय क्रमांक स्नेहल जोशी (जि.अहमदनगर) यांनी पटकावला. 
   यामध्ये महाराष्ट्र राज्यातुन अनेक स्पर्धकानी आपला सहभाग नोंदवुन दिलेल्या विषयावर मत व्यक्त केले.या स्पर्धेचे परिक्षक म्हणुन गौतम कांबळे बामसेफ प्रचारक नवी मुंबई व नितीन वाघमारे बामसेफ प्रचारक नवी मुंबई यांनी काम पाहिले. विजेत्याना बक्षिस अनुक्रमे १००१रुपये, ५०१ रुपये , ३०१ रुपये व सन्मानपत्र देण्यात आले.सर्व स्पर्धकानाही सन्मानपत्र देण्यात आले.या कार्यक्रमासाठी युगपुरुष प्रतिष्ठान नेरुळ, नवी मुंबईचे उपाध्यक्ष  विजय रणदिवे, खजिनदार निखील खरात व तनवीर शेख, सचिव अजय रणदिवे व कार्याध्यक्ष समाधान गायकवाड या सर्वांनी उत्तम नियोजन करुन ही राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा यशस्वी केली. युगपुरुष प्रतिष्ठान नेरुळ , नवी मुंबई च्या सर्व टिमनी सर्व स्पर्धकाना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने