(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गोंडपिपरी:- तोहोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातून ८ मार्चला वेजगाव येथील मारोती आडकु साळवे (६०) यांनी कोविड १९ ची लस टोचून घेतली. लस घेतल्याच्या एक महिन्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांत दहशत पसरली आहे. मात्र त्याचा मृत्यू नेमका कशाने झाला, याचा उलगडा होऊ शकला नाही. त्यांचा मृत्यू हृयविकाराच्या झटक्याने झाला असावा, असा कुटुंबीयांचा अंदाज आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील तोहगाव प्राथमिक केंद्रात कोरोना लसीकरण ६० वर्षावरील लोकांसाठी सुरू करण्यात आले होते. तोहोगाव केंद्रातील ८१० लोकांनी लस टोचून घेतली आहे. त्यात मारोती साळवे यांनी ८ मार्चला लस टोचली. लस घेतल्यावर तीन दिवसानंतर ताप आला.
ते उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्याऐवजी तोहोगाव येथील खासगी डॉक्टरकडे जाऊन उपचार केला. मात्र त्यांचा ताप कमी होत नसल्याने विरुर ( स्टे.) येथील ख्रिश्चन दवाखान्यात उपचार घेऊन घरी परतला. त्यानंतर ८ एप्रिलला घरी सकाळी नाश्ता घेऊन गावात फिरून घरी आल्यानंतर त्याचा अचानक मृत्यू झाला.
कोरोना लस घेतल्यानंतर काहींना ताप येत असतो. मात्र त्याचा उपचार सरकारी दवाखान्यात करायला पाहिजे. परंतु तसे न करून खाजगी उपचार त्यांनी घेतला. दरम्यान, त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याची घरच्यांची प्रतिक्रिया आहे.
तोहोगाव आरोग्य केंद्रात ८१० जणांनी लस घेतली असून कुणावरही बाधा झाली नाही. या लसीने कोणताही परिणाम होत नाही. केवळ काहींना ताप येतो. त्यासाठी केंद्रात औषध आहे. कुणीही खासगी दवाखान्यात उपचार करू नये. मारोती साळवे यांचा मृत्यू कशाने झाला हे सांगणे सध्या अशक्य आहे.
डॉ. सुनिता भारती गिरी
वैद्यकीय अधिकारी,
प्रा.आरोग्य केंद्र, तोहोगाव.लस घेतल्याच्या तीन दिवसानंतर ताप आला. त्यावर तोहोगाव व विरुर ( स्टे.) येथील खासगी दवाखान्यात उपचार केला. यातून ते बरे झाले. मात्र ८ एप्रिलला अचानक त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा.संतोष साळवे, मृताचा लहान भाऊ
रा. तोहोगाव ता. गोंडपिपरी