Top News

मानोरा आणि कळमना येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्रे जनतेच्‍या सेवेत रूजु करावी:- आ. सुधीर मुनगंटीवार

निधी प्राप्‍त होताच पहिल्‍या टप्‍प्‍यात मानोरा आणि कळमना प्रा. आ. केंद्रांना प्राधान्य:- राहुल कर्डीले.
Bhairav Diwase. April 28, 2021
चंद्रपूर:- बल्‍लारपूर तालुक्‍यातील मानोरा आणि कळमना या गावांमध्‍ये प्राथमिक आरोग्‍य केंद्रांच्‍या इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले असुन कोरोना महामारीच्‍या काळात नागरिकांना उत्‍तम आरोग्‍य सेवा मिळाव्‍यात याद़ष्‍टीने त्‍वरीत सदर प्राथमिक आरोग्‍य केंद्रे जनतेच्या सेवेत रूजु करावी अशी मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

दिनांक २८ एप्रील रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी वरील विषयाच्‍या अनुषंगाने झुम मिटींग द्वारे जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. राहुल कर्डीले यांचेशी संवाद साधला. या बैठकीला जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी, तालुका वैदयकीय अधिकारी, जिल्‍हा परिषद सदस्‍या सौ. वैशाली बुध्‍दलवार, बल्‍लारपूर पंचायत समिती सभापती सौ. इंदिरा पिपरे, उपसभापती सोमेश्‍वर पद्मगिरीवार, बल्‍लारपूर तालुका अध्‍यक्ष किशोर पंदीलवार, राजु बुध्‍दलवार, रमेश पिपरे, बल्‍लारपूर पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

या दोन्‍ही प्राथमिक आरोग्‍य केंद्राच्‍या माध्‍यमातुन कोविड तसेच नॉन कोविड रूग्‍णांना वैदयकीय उपचाराची योग्‍य सोय उपलब्‍ध होईल यासाठी आवश्‍यक पदभरती सुध्‍दा तातडीने करण्‍याच्‍या सुचना आ. मुनगंटीवार यांनी दिल्‍या. या प्राथमिक आरोग्‍य केंद्रांसाठी वैदयकीय उपकरणे व फर्निचर खरेदी साठी निधीची मागणी करण्‍यात आली असुन प्रशासकीय मान्‍यता देत पहील्‍या टप्‍प्‍यात मानोरा आणि कळमना येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्रे सुरू करण्‍यात येतील अशी माहीत मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. राहुल कर्डीले यांनी दिली. राष्ट्रीय आरोग्‍य अभियानाच्‍या माध्‍यमातुन पदभरतीसाठी जाहीरात प्रसिध्‍द करण्‍यात आली असुन त्‍यामध्‍यमातुन वैदयकीय अधिकारी, एएनएम व अन्‍य आरोग्‍य कर्मचा-यांची पदे भरण्‍यात येतील असेही त्‍यांनी सांगीतले. कोविडचा सामना करताना ग्रामीण भागात जिल्‍हा परिषद शाळेचे नुतनीकरण करून त्‍या शाळा उत्‍तम सेवेसह वापरता येतील त्‍याद़ष्‍टीने सुध्‍दा योग्‍य आराखडा तयार करण्‍याच्‍या सुचना आ. मुनगंटीवार यांनी दिल्‍या. त्‍याचप्रमाणे चंद्रपूर जिल्‍हयात 11 तालुके मानव विकास निर्देशांकात येतात त्‍यामुळे आरोग्‍यासाठी या तालुक्‍यांना प्रत्‍येकी 1 कोटी रू. निधी देण्‍याची मागणी सुध्‍दा त्‍यांनी यावेळी केली. आवश्‍यकता असल्‍यास आपण नियोजन विभागाच्‍या सचिवांशी चर्चा करू असेही आ. मुनगंटीवार यांनी सांगीतले. ग्रामीण भागात ऑक्‍सीजन बेडस् वाढविण्‍याच्‍या द़ष्‍टीने आ. मुनगंटीवार यांनी यावेळी उपाययोजना करण्‍याच्‍या सुचना केल्‍या. ऑक्‍सीजन व मनुष्‍यबळ यामुळे बेड वाढविण्‍यात अडचण येत असल्‍याचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. राहुल कर्डीले यांनी सांगीतले, त्‍याद़ष्‍टीने आवश्‍यक कार्यवाही व उपाययोजना सुरू असल्‍याची माहीती त्‍यांनी दिली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने