Top News

माजी मंत्री देवतळे यांच्या निधनावर लोकप्रतिनिधी यांच्या शोकसंवेदना.

शांत, सुस्‍वभावी, सुसंस्कृत नेता हरपला:- आ. सुधीर मुनगंटीवार

राज्‍याचे माजी मंत्री संजय देवतळे यांच्‍या निधनाने शांत, सुस्‍वभावी, सुसंस्कृत नेता हरपल्‍याची शोकभावना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली आहे.
संजय देवतळे यांच्‍या निधनाची बातमी धक्‍कादायक असुन या बातमीवर विश्‍वासच बसत नाही. विधानसभा सदस्‍य म्‍हणुन त्‍यांनी दीर्घकाळ जनतेची सेवा केली आहे. अतिशय शांतपणे, संयमितपणे जनतेचे प्रश्‍न विधानसभाग़हात मांडणारा अभ्‍यासु लोकप्रतिनिधी म्‍हणुन त्‍यांनी आपली ओळख निर्माण केली होती. पर्यावरण व सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच चंद्रपुर जिल्ह्याचे पालकमंत्री म्‍हणुन त्‍यांनी उत्‍तम कामगिरी बजावली. त्‍यांच्‍या निधनाने चंद्रपूर जिल्‍हयाच्‍या राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. परमेश्‍वर त्‍यांच्‍या कुटुंबियांना या दु’खातुन सावरण्‍याचे बळ देवो असे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे.


अत्यंत लोकप्रिय निष्कलंक राजकीय जीवन जगनारे, फार जवळीक असणारे विश्वासु व जिव्हाळ्याचे मित्र सहकारी संजय देवतळे यांच्या रूपात गमावला - हंसराज अहीर, पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री.

अत्यंत लोकप्रिय निष्कलंक राजकीय जीवन जगनारे, गेली ७ - ८ वर्षांपासून फार जवळीक असणारे विश्वासु व जिव्हाळ्याचे मित्र सहकारी च्या रूपात संजय देवतळे गेल्याने अतीव दुःख झाले. हि न भरून निघणारी हानी आहे, नेहमीच स्मरणात राहील असं व्यक्तिमत्व आम्ही गमावल अशी भावपूर्ण प्रतिक्रिया पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी पूर्व पालकमंत्री तसेच भाजपचे जेष्ठ नेते संजय देवतळे यांच्या निधन वार्ता नंतर दिली आहे. नागपूर येथील रुग्णालयात कोविड शी लढतांना संजय देवतळे यांचे निधन झाले आहे.
राजकारण व समाजकारणात अनेक नावे असतात मात्र राजकारणाच्या पलीकडे जनमानसात आपली ओळख निर्माण करून जगणारे नेते हे क्वचितच आढळतात त्यातील एक उदाहरण म्हणजे स्व. संजय देवतळे हे आहेत. त्यांच्यावर कोरोनाने घातलेला आघामुळे चंद्रपूर जिल्ह्याने एका सच्चा नेत्याला गमावले आहे त्यांचे असे जाने भाजपा व जिल्ह्यातील नागरिकांची ची न भरून निघणारी हानी आहे. ईशर त्यांच्या आत्म्याला शांति देवो व त्यांच्या परिवाराला हा मोठा आघात सहन करण्याची ताकद देवो अशी प्रतिक्रिया पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली.  
     
     वरोरा विधानसभेत त्यांनी केलेली जनसेवा हि सदैवच तेथील नागरिकांच्या व सर्व नेत्यांच्या स्मरणात असेल. त्यांच्यासारखा नेता हा वरोरा विधानसभेत दुसरा होणे नाही अशी त्यांनी या विधानसभेतील नागरिकांच्या मनात छाप सोडलेली आहे. आमदार ते राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हा त्यांचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे असे यावेळी हंसराज अहीर यांनी सांगितले. 
     
     देवतळे साहेब म्हणजे मृद भाषी, शांत व संयमी  स्वभावाचे धनी असल्याने जनमानसाच्या मनात त्यांच्याविषयी अपार आदर बघायला मिळायचा व त्यांच्या या गुण कौशल्याचा आपल्यालाही आकर्षण होते असेही अहीर यांनी प्रतिक्रियेच्या माध्यमातून सांगितले. 
     
    संजय देवतळे यांनी आपल्या विरोधांत निवडणूक सुद्धा लढवली मात्र जिल्ह्यातील राजकारणाची गरिमा नेहमीच लक्षात घेत त्यांनी शब्दांच्या गरिमेचा बाण कधीच तुटू दिला नाही याबद्दल त्यांचा नेहमीच आदर वाटतो. त्यांच्या सह निवडणुकी लढविण्याचा अनुभव सुद्धा जीवनात नेहमीच आठवणींचा राहील त्यांच्या सारखा नेता होणे नाही   अशी भाव प्रतिक्रिया सुद्धा यावेळी हंसराज अहीर यांनी व्यक्त केली.


कर्तबगार नेतृत्व हरपला-डॉ.मंगेश गुलवाडे

माजी मंत्री संजय जी देवतळे यांच्या निधनाने जिल्ह्यातील कर्तबगार नेतृत्व हरपल्याची शोकभावना भाजप चंद्रपुर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी व्यक्त केली आहे.अतिशय सुस्वभावी व्यक्तिमहत्व जनतेचे प्रश्न सोडविणारे कर्तबगार नेतृत्व म्हणून त्यांची ख्याती जनसामान्यांत होती.त्यांचे निधनाने सामाजिक हानी झाल्याचे दुःख डॉ.गुलवाडे यांनी व्यक्त केली.

शांत, संयमी, अभ्यासू, कर्तृत्ववान, व्यक्तिमत्त्व असलेला नेता आमच्यातून परमेश्वराने हिरावून नेला:: आ. बंटीभाऊ भांगडीया.

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री  श्री. संजयबाबू देवतळे यांच्या आकस्मित झालेल्या निधनाची बातमी अतिशय धक्कादायक आहे.
त्यांच्या निधनाने राजकिय व सामाजिक क्षेत्रात निर्माण झालेली ही पोकळी कधी न भरून निघणारी आहे. विधानसभा सदस्‍य म्‍हणुन त्‍यांनी दीर्घकाळ जनतेची सेवा केली. पर्यावरण व सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच चंद्रपुर जिल्ह्याचे पालकमंत्री म्‍हणुन त्‍यांनी उत्‍तम कामगिरी बजावली. त्‍यांच्‍या निधनाने चंद्रपूर जिल्‍हयाच्‍या राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

ईश्वर त्यांच्या कुटुंबावरील आलेल्या या संकटातून सावरण्यास सामर्थ्य प्रदान करो व त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!


राजकीय सहकारी गमावला - विजय वडेट्टीवार

माजी मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री श्री. संजयजी देवतळे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे.
पर्यावरण व सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले होते.
त्यांच्या निधनाने मनमिळाऊ राजकीय सहकारी आज गमावलेला आहे. या दुःखातून सावरण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबाला मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

जनतेचे प्रश्‍न विधान सभागृहात मांडणारा अभ्‍यासु लोकप्रतिनिधी हरपला:- माजी आमदार अँड संजय या धोटे

राज्‍याचे माजी मंत्री संजय देवतळे यांच्‍या निधनाने शांत, सुस्‍वभावी, सुसंस्कृत नेता हरपल्‍याची शोकभावना माजी आमदार अँड संजय या धोटे यांनी व्‍यक्‍त केली आहे.
संजय देवतळे यांच्‍या निधनाची बातमी धक्‍कादायक असुन या बातमीवर विश्‍वासच बसत नाही. विधानसभा सदस्‍य म्‍हणुन त्‍यांनी दीर्घकाळ जनतेची सेवा केली आहे. अतिशय शांतपणे, संयमितपणे जनतेचे प्रश्‍न विधानसभाग़हात मांडणारा अभ्‍यासु लोकप्रतिनिधी म्‍हणुन त्‍यांनी आपली ओळख निर्माण केली होती. पर्यावरण व सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच चंद्रपुर जिल्ह्याचे पालकमंत्री म्‍हणुन त्‍यांनी उत्‍तम कामगिरी बजावली. त्‍यांच्‍या निधनाने चंद्रपूर जिल्‍हयाच्‍या राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. परमेश्‍वर त्‍यांच्‍या कुटुंबियांना या दु’खातुन सावरण्‍याचे बळ देवो असे आ. यांनी म्‍हटले आहे.


संजयबाबूंच्या निधनाने वरोरा- भद्रावती मतदार संघाची हानी:- खासदार बाळू धानोरकर

ज्येष्ठ नेते रामचंद्र उपाख्य दादासाहेब देवतळे यांचा वारसा त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून निस्वार्थपणे सांभाळणारे माजी मंत्री चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री श्री. संजयबाबू देवतळे यांच्या निधनाने वरोरा-भद्रावती मतदार संघाची हानी झाली आहे, अशा शोकभावना चंद्रपूर- वणी लोकसभा मतदार संघाचे खासदार बाळू धानोरकर यांनी व्यक्त केली.
संजयबाबू देवतळे यांनी वरोरा-भद्रावती मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले. त्याच मतदार संघात सेवा करण्याची संधी मलाही आमदारकीच्या रूपात मिळाली. आज त्याच्या विकासाचा रथ आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहोत. मात्र, अतिशय शांत, संयमी लोकप्रतिनिधी कायमचा हरवल्याने वरोरा-भद्रावती मतदार संघाची हानी झाली आहे. मी २००९ मध्ये पहिल्यांदा त्यांच्याच विरोधात विधानसभा लढली. मी तेव्हा हरलो. मात्र, संजयबाबू जिंकल्याचा तितकाच आनंद होता. कारण ते मंत्री होऊ शकले आणि वरोरा- भद्रावती मतदार संघाचे नावलौकिक केले. हा मनातील आनंद मी त्यांना भ्रमणध्वनीवर विजयी शुभेच्छा देताना बोलून दाखविला होता. पक्षीय मतभेद विसरून कामे करणारा नेता आपल्याला सोडून गेल्याचे दुःख आहे.
त्यांच्या आत्म्याला शांती लाभो व या क्षेत्रातील त्यांच्यावर प्रेम करणा-या जनतेला या दुखातून सावरण्याचे बळ मिळो, हीच प्रार्थना...!



प्रसिध्दीपराडमूख नेत्यास समाज मुकला – आ. किशोर जोरगेवार

अतिषय शांत स्वभावाने सा-यांनाच आपलेसे वाटणारा प्रसिध्दीपराडमुख नेत्यास समाज मुकला असल्याची शोकसंवदेना राज्याचे माजीमंत्री संजय देवतळे यांच्या निधनानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली.
सलग चार वेळा वरोरा – भद्रावती विधानसभेचे नेतृत्व त्यांनी केले. या काळात त्यांनी आपल्या शांत स्वभावाने कार्यकर्ते जोडत संघटन बळकट केले. त्यांच्या नेतृत्वात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेवर पक्षांचा झेंडा फडकविला. काॅंग्रेस सरकारच्या काळात त्यांच्यावर मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. ती ही त्यांनी उत्तम रित्या पेलली. आज त्यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्राचे मोठे नूकसान झाले आहे. ईश्वर त्यांच्या परिवराला या दुखातून सावरण्याचे बळ देवो हीच प्रार्थना करतो अशा शब्दात आमदार किशोर जोरगेवार यांनी शोकसंवेदना व्यक्त केली आहे.



शांत सुस्वभावी, संयमी राजकारणी, साधे सरळ व्यक्तिमत्व, माजी पालकमंत्री, माजी राज्यमंत्री, माजी आमदार संजयबाबु देवतळे यांचे अकस्मात आपल्यातून निघून जाणे हे वरोरा विधानसभा क्षेत्रासाठीच नाही तर राज्यासाठी एक अपिरीमित हानी आहे. राजकारणात अशी सरळमार्गी व साधी माणसं आता फार कमी राहीली आहे.
मी जेव्हा आमदार म्हणुन निवडू आली, तेव्हा संजयबाबुंचा मला कॉल आला व वरोरा विधानसभेच्या प्रथम महिला आमदार म्हणुन शुभेच्छा दिल्या. तसेच या क्षेत्राच्या लवकरच प्रथम महिला मंत्री व्हाव्या, असा आशीर्वादही दिला. ते शब्द आजही मला भावूक करतात.
ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करो व त्यांच्या आप्तपरीवारास तथा त्यांच्यावर प्रेम करणा-या तमाम जनतेला दुखा:तून सावरण्याचे बळ मिळो, हिच प्रार्थना.

आमदार सौ. प्रतिभा धानोरकर
वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र,
वरोरा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने