महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मूल चे सचिव मनिष रक्षमवार यांचा पुढाकार.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
मुल:- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे मूल तालुका शाखेचे सचिव मनिष रक्षमवार काल 25/04 ला आपला वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा करून सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे.
वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला उपजिल्हा रूग्णालय, मुल येथे ९ ऑक्सीजन सिलेंडर भेट देत एक आगळा आदर्श नागरिकांसमोर ठेवला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सध्या ऑक्सीजनचा तुटवडा सर्वांना जाणवत आहे. अशा परिस्थिती महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मूल या शाखेचे सचिव मनिष रक्षमवार यांनी हे ऑक्सीजन सिलेंडर उपजिल्हा रूग्णालयाला भेट देत या ईश्वरीय कार्याला हातभार लावला. याबद्दल माजी कॅबिनेट मंत्री (महाराष्ट्र) आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी संघाचे सचिव मनिष रक्षमवार यांचे पत्राद्वारे मनःपूर्वक अभिनंदन केले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे आपण पदाधिकारी आहात आणि पत्रकार म्हणुन सुध्दा आपला हा पुढाकार अभिनंदनीय आहे. अशा शब्दात सुधीरभाऊंनी पुनःश्च मनःपूर्वक अभिनंदन देऊन त्यांना वाढदिवसानिमित्त लोकसेवेसाठी आपणास निरामय दिर्घायुष्य लाभावे हीच या शुभदिनी शुभेच्छा दिल्या.
सोबतच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पूर्व विदर्भ अध्यक्ष प्रा. महेश पानसे यांनी सुद्धा मनिष रक्षमवार यांचे संघातर्फे कौतुक करत अभिनंदन केले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकरिता ही अभिमानाची बाब आहे असे त्यांनी सांगितले.