Top News

विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या 136 जणांची केली कोरोना चाचणी 6 जण आढळले बाधित.

तहसील व पोलीस विभागाची मोहीम.
Bhairav Diwase. April 26, 2021
मुल:- लाॅकडाऊन असताना विनाकारणाने वारंवार बाहेर फिरणाऱ्यांवर पायबंद घालण्यासाठी उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर व उपविभागीय पोलीस अधिकारी अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने कोवीड तपासणी करण्याची योजना आखली.

रविवारी सकाळी राबविलेल्या या मोहिमेत विनाकारण फिरणाऱ्या 136 जाणांची ॲंटिजन चाचणी करण्यात आली. यात 6 जण बाधित आढळले. या मोहिमेमुळे विनाकारण फिरणाऱ्यांना चांगलाच चाप बसला आहे. काही वेळातच मूल शहरात शांतता निर्माण झाली. कोरेानाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने, प्रशासनाने लाॅकडाउन करण्याचा निर्णय घेतला. लाॅकडाउन सेवेसाठीच घराबाहेर पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले. मात्र, लोकांचे बाहेर पडणे काही थांबले नाही. त्यामूळे मूल तालुका प्रशासन, नगर प्रशासन व पोलीस प्रशासनाने संयुक्तरीत्या विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची ॲंटीजन तपासणी करण्याची योजना आखली या मोहिमेत तसीलदार डाॅ. रवींन्द्र होळी, पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपूत, गटविकास अधिकारी डाॅ. मयूर कळसे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम, नायब तहसिलदार यशवंत पवार आदींनी गांधी चैक व परिसरातील रस्तावर नाकेबंदी केली. या अनुषंगाने 136 नागरिकांनी अडवून पत्रकार भवन येथे असलेल्या कोविड तपासणी केंद्रात चाचणी करण्यात आली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने