Top News

ब्रम्हपुरी येथे जंबो कोविड सेंटर उभारा:- प्रा. अतुल देशकर.

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंना पत्राद्वारे केली मागणी.

विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस व माजी अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनाही पाठविले पत्र.
Bhairav Diwase. April 19, 2021
ब्रम्हपुरी:- मागील तीन ते चार दिवसांपासून ब्रम्हपुरी तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेले दोन दिवसांत नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णांचा आकडा २०० च्या घरात आहे. ब्रम्हपुरी येथे या आजाराने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. अशा परिस्थितीत ब्रम्हपुरी येथे कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मुबलक व्यवस्था उपलब्ध नाही. ब्रम्हपुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटर्स सुद्धा उपलब्ध नाही. या सर्व बाबी लक्षात घेत ब्रम्हपुरी येथे सर्व सोयीयुक्त जंबो कोविड सेंटर उभारण्याची मागणी ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. या संदर्भात त्यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस व माजी अर्थ मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनाही पत्र दिले आहे.



ब्रम्हपुरी येथील ख्रिस्तानंद चौकात एका कोरोना ग्रस्त रुग्णाचा बेड न मिळाल्याने व उपचारा अभावी मृत्यू झाला. येणाऱ्या काळात परिस्थिती लक्षात घेऊन आताच ब्रम्हपुरी येथे जंबो कोविड सेंटर उभारणे आवश्यक आहे. ब्रम्हपुरी येथे जंबो कोविड सेंटर झाल्यास ब्रम्हपुरी तालुक्यासह आजूबाजूच्या तालुक्यातील ही रुग्णांना याचा फायदा होईल असे माजी आमदार अतुल देशकर यांनी पत्रात लिहिले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने