(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- संपूर्ण देशात कोरोना विषाणुने थैमान घातले असून राज्यात कोरोना बाधीतांची संख्या दिवसागणिक झपाट्याने वाढत आहे यावर प्रतिबंध म्हणून राज्य शासनाने संपूर्ण राज्यात 15/04/2021 पासून संचारबंदी लागू केली असून आज पहिल्याच दिवशी पोंभूर्णा नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद पहावयास मिळाला.
कोरोनाला हद्दपार करण्याकरीता सर्वांनी शासनाला सहकार्य करावे. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी. तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.