जनसामान्यांच्या मनात राज्य करणारे जि. प. सदस्य म्हणजे राहुल भाऊ संतोषवार.

Bhairav Diwase

हाक तुमची.... साथ आमची या सुत्रांनुसार चालणारे राहुल भाऊ.

लेख संकलन:- चंद्रशेखर झगडकर
             भैरव दिवसे

केमारा- देवाडा जिल्हा परिषद क्षेत्रात भाजपाचे जि. प. सदस्य ०१, तर पं. स. सदस्य ०२ या उमेदवारांना रणांगणात उतरवले. आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या विकासाच्या कामावर जनतेनी विश्वास ठेवत केमारा- देवाडा जिल्हा परिषद च्या निवडणुकीत भाजपाचे तीनही उमेदवार विजयी झाले. जि. प. सदस्य ०१, तर पं. स. सदस्य ०२ या क्षेत्रात ३ उमेदवारांनी निवडणूक लढवून ती जिंकली सुध्दा. या निवडणुकीत क्षेत्रातील नागरिकांच्या आग्रहास्तव भाजपा ने राहुल भाऊ संतोषवार यांना जि. प. ची उमेदवार दिल्याने नागरिकांमध्ये आनंदाच वातावरण निर्माण झाल होत. क्षेत्रातील असंख्य नागरिकांच्या व युवकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर सुरुवात झाली त्यांच्या राजकारणाची....... जेष्ठ नागरिक त्यांना राहुल सावकार म्हणून ओळखत. जि. प. क्षेत्रातील कार्यकर्ते व नागरिकांनी राहुल भाऊ ला जि. प. सदस्य म्हणून प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळावी यासाठी रात्रो-दिवस प्रचाराला सुरुवात केली.

       हाक तुमची.... साथ आमची या सुत्रांनुसार क्षेत्रात प्राचाराचा नारळ फोडून श्रीगणेशा केला. प्रचार झाला, आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या विकासाच्या कामावर जनतेनी विश्वास टाकला आणि राहुल भाऊ संतोषवार यांच्या चिन्हा समोरील बटन दाबली. निवडणूक संपली, आता लक्ष लागले होते फक्त आणि फक्त निकालाकडे.... जस जशी निकालांची तारीख जवळ येत तसे क्षेत्रातील नागरिकांमध्ये चर्चेला पेव फुटला. या जि. प. सदस्य म्हणून राहुल भाऊ संतोषवारच प्रतिनिधीत्व करणार...... जि. प. क्षेत्रातील नागरिकांच्या मुखात फक्त राहुल भाऊ संतोषवार..... संतोषवारांच्या गळ्यात विजयाची माळ घालणार असा विश्वासच नागरिकांमध्ये होता. निकालांची तारीख आली, क्षेत्रातील नागरीकांच लक्ष होत फक्त केमारा- देवाडा जिल्हा परिषद क्षेत्राकडे.... क्षेत्राचे निकाल जाहीर होऊ लागले तसे क्षेत्रातील नागरिकांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली. लगेच केमारा-देवडा जिल्हा परिषद क्षेत्राचा निकाल जाहीर झाला. आणि विजयी कोण झाले? तर लोकांच्या मुखात क्षेत्राच्या उमेदवार नाव होते तेच म्हणजे राहुल भाऊ संतोषवार........

  विजयी उमेदवारांचे पोंभुर्णा येथे क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी व जनतेने जंगी स्वागत केले, नावाने जयघोष करीत. कोण आला रे कोण आला..... जिल्हा परिषद क्षेत्राचा वाघ आला. असा कसा येत नाही..... आल्या शिवाय राहत नाही. राहुल भाऊ तुम आगे बढो... हम तुमारे साथ है. असा जयघोषाने पोंभुर्णा तालुका दुमदुमली. भाऊंनी भरघोस मतांने निवडणून दिल्याबद्दल सर्व जनतेचे आभार मानले. आणि तेव्हा पासूनच ते विकास कामाला सुरुवात केले.

मागच्या वर्षी कोवीड-१९ ने जगभरात थैमान घातला. त्यानंतर केंद्र सरकारच्या आदेशानुसार राज्य सरकारने  महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊन केला. गरीब जनतेला खायचे हाल जाणवू लागल्याने माजी अर्थ व नियोजन मंत्री तथा विद्यमान विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल संतोषवार यांनी मागील वर्षी कोरोना काळात आपल्या जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये विविध कार्य केले. कोरोना लॉकडाऊन मध्ये गरीब, अपंग, विधवा कुटुंबाना जीवनावश्यक वस्तुचे किटचे वाटप करण्यात आले.

      भैरव धनराज दिवसे यांनी राहुल भाऊ सोबत संपर्क साधून चेक बल्लारपूर येथे काही गरजू व्यक्ती आहे. त्या जिवनावश्यक वस्तुंच किटची आवश्यक आहे. हि आपबिती सांगितली लगेच भाऊंनी तात्काळ भैरव ला किट दिले. आणि भैरव ने राहुल भाऊ च्या नेतृत्वाखाली किटच वाटप केले. कोरोना लॉकडाऊनच्या काळात जनतेचे आरोग्य सुदृढ राहावे या उद्देशाने मास्क, सानिटाईजर, हँडवाश, साबून चे वितरण करून आरोग्याची काळजी घेण्याचे आव्हान केले.


प्राथमिक आरोग्य केंद्र पोंभुर्णा येथील अंबुलन्स 108 चे वाहन चालक यांना कोरोना योद्धा म्हणुन शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आले. गाव पातळीवर महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या आशा वर्कर यांना हँडवाश, मास्क, सानिटाईजर, साबून देण्यात आले. पोंभुर्णा येथील नगर पंचायतच्या सफाई कामगारांना जीवनावश्यक किट व त्यांना आरोग्याच्या सुरक्षितेसाठी सुरक्षा किट वाटप करण्यात आले.
 

  मागील काळात राहुल संतोषवार यांनी जन माणसापर्यंत पोहचून कार्य केल्याने जनमानसात त्यांची विशिष्ट छबी उमटलेली. वयोवृद्धाना चालण्याकरिता एक आधार असावा म्हणूनन वाकिंग स्टिक ची काळीच वाटप करण्यात आले. या उपक्रमाची चर्चा होऊन सर्वच स्तरावरून अभिनंदन केले गेले.
   

   पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वृध्द व्यक्तींना वाकिंग स्टिक ची काळी चे वाटप करण्यात आले. गरजू निराधार, अपंग, विधवा कुटुंबाना ब्लॅंकेटचे वाटप त्यांच्या उपस्थितीत झाले. लहान मुलांचे आरोग्य सुदृढ राहावे या उद्देशाने मुलांना केशर युक्त दूध, बिस्किटच वाटप करण्यात आले. पोंभुर्णा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.
     आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार यांनी गंगापूर नवीन, घनोटी तुकुम, आंबेधानोरा येथील तलावाच्या वेस्ट वेअर ची समस्या शेतकऱ्यांनी सांगितले. या शेतकऱ्यांची समस्या लक्षात येताच तात्काळ पाठपुरावा करून येथील तलावाच्या वेस्टवेअर ची समस्या मार्गी लावल्याने शेतकऱ्यांनी आभार मानले. क्षेत्रात वैयक्तिक लाभाच्या योजना बिरसा मुंडा, शेतकरी सिंचन योजना अंतर्गत विहिरी ची योजना, शबरी घरकुल योजना अंतर्गत घरकुलाच्या योजना, समाजकल्याण, महिला बाल विकास योजने अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन लाभ मिळवून देण्याच काम राहुल भाऊ यांनी केले.
माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या वाढदिवसानिमित्त झुल्लुरवार तुकुम येथे वृध्द व्यक्तींना वाकिंग स्टिक ची काळी चे वाटप करण्यात आले.

              लच्छमपूर येथील पिण्याच्या पाण्याची समस्याची बातमी आधार न्युज नेटवर्क प्रकाशित होताच जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती उपसभापती यांनी तात्काळ गावाला भेट दिली. व लकरच समस्या  सोडविण्यात येणार असे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती उपसभापती यांनी शब्द दिला. लच्छमपूर येथील पिण्याच्या पाण्याची समस्याची आधार न्युज नेटवर्कची बातमी व राहुल भाऊ संतोषवार यांच्या निवेदनाची तात्काळ दखल घेत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रव्यवहार करून लच्छमपूर येथील पिण्याच्या पाण्याची समस्याची सोडवली.


    गाव म्हटल्या वर लोक जमा होतात आणि मग सुरू होतात चर्चा...... चर्चा करताना बसायच कुठे हा प्रश्न जनतेला भेडसावत. याची दखल घेत केमारा-देवाडा जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये प्रत्येक गावामध्ये नागरिकांना बसण्याकरिता प्रत्येक चौकामध्ये बाक बेंचेसची व्यवस्था करुन दिली.

आ. डॉ. रामदास आंबटकर यांच्या वाढदिवसानिमित्त केमारा-देवाडा जिल्हा परिषद क्षेत्रात विविध ठिकाणी वृक्षारोपण राहुल भाऊ यांनी केले.

     आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार माजी अर्थ, नियोजन व वन मंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त केमारा-देवाडा जिल्हा परिषद क्षेत्रात विविध ठिकाणी वृक्षारोपण राहुल भाऊ तसेच तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले.
  

      पोंभुर्णा तालुक्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आ. सुधीर मुनगंटीवार पुढाकाराने श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय सुरू करण्यात आले. त्या वाचनालय रोज ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दुपारचा चहाची व्यवस्था करण्यात आली.

      श्री. राहुल संतोषवार यांनी 26 जानेवारी ला प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून देश सेवेसाठी कार्य करणाऱ्या मुलांना प्रत्यक्ष भेटून शाल, श्रीफळ, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन 4 युवकांचा सत्कार करण्यात आला होता. हे 4 युवक पोंभुर्णा तालुक्यातील असल्याने कसरगठ्ठा येथील मुकेश कोसरे BSF, डोंगरहळदी येथील अंकुश बुरांडे BSF, सातारा तुकुम प्रमोद भुरसे BSF, आंबेधानोरा येथील रंजित पेंदोंर CISF या सर्व विद्यार्थ्यांचे केंद्रीय पोलीस दल भरतीमध्ये निवड करण्यात आली आहे

          तिसरे नॅशनल ओपन कुंग-फु कराटे चॅम्पियनशिप 2021-22 स्पर्धेतील विजेत्याचे श्री.राहुल संतोषवार सदस्य जिल्हा परिषद,चंद्रपुर यांच्या हस्ते उमरी पोतदार येथे पोंभुर्णा तालुक्यतील चमूचें सत्कार करण्यात येऊन त्यांना खेळण्याचे साहित्य लवरच घेऊन देण्यात येणार आहेत. यावेळी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.


          पोंभुरणा तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना ग्रामीण रुग्णालय पोंभुरणा येथे कोविड चे लस दिली जात असल्याने राहुल संतोषवार यांनी नागरिकांना 6 एप्रिल ला भाजपा स्थापना दिनाचे औचित्य साधून  पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे.
           आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल संतोषवार यांनी विविध लोकाभिमुख कार्य केल्याने त्यांची छबी जनमानसात त्यांच्या मागील काळात आढळून येते. राहुल भाऊंनी केलेले कामाची प्रत्येक बातमी आधार न्युज नेटवर्क ला येत होती.

आधार न्युज नेटवर्क ला प्रकाशित झालेल्या बातमी......

👇👇👇👇👇👇

आधार न्युज नेटवर्क......

 https://www.adharnewsnetwork.com/2021/04/blog-post_734.html?m=1


लेख संकलन:- चंद्रशेखर झगडकर रा. गंगापुर नवीन


भैरव दिवसे रा. चेक आष्टा