इसमाची गळफास घेऊन आत्महत्या.

Bhairav Diwase
0

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
ब्रम्हपुरी:- तालुक्यातील तोरगाव (बु) येथे इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मृतक इसमाचे नाव नानाजी राऊत वय वर्षे 70 असे असून तोरगाव(बु) येथील रहिवासी आहे.
सविस्तर वृत्तांत या प्रमाणे आहे की,पाहाटेच्या सुमारास गावालगत असलेल्या झाडांची नर्सरी मध्ये जाऊन एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर मृतक इसमाने आत्महत्या का केली? अजूनही गुलदस्त्यात आहे.

मृतक इसमाच्या पच्छात्य दोन मुलं, दोन सून, पत्नी,नातवंड पाच असा आप्त परिवार आहे. मृतक नानाजीच्या जाण्याने कुटूंबात व गाव परिसरात शोककळा पसरली आहे. संबधित घटनेचा पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस विभाग करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)