अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुका वरूर या गावाजवळील काल रात्री गुरुवारला सुमारे ८ चा दरम्यान प्रकाश कोंडूजी वाडगुरे नामक व्यक्ती रा. सोमनाथपुर राजुरा आपल्या स्वगावाहुन सासुरवाडी जाण्यास निघाला असता वरुर गावाजवळ या व्यक्तीच्या दुचाकीसमोर अचानक बैल आल्याने अपघात घडला आहे.
राजुरा पासून 7 किमी अंतरावर असलेल्या वरुर रोड येथे दुचाकीस्वाराने गायीला जबर धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवार दि. 20 मे च्या रात्री 8 वाजताच्या दरम्यान घडली.
मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार राजुरा कडून भरधाव वेगाने येत असलेल्या मोटार सायकल क्रमांक MH34 AG 7259 च्या समोर मोकाट बैल समोर आल्याने चालकाचे नियंत्रण सुटून खाली पडल्याने दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला. प्रकाश कोंडू वाटगुरे वय 34 असे मृतकाचे नांव असून तो राजुरा येथील सोमनाथपूर वॉर्डातील रहिवासी होता. मृतक एका ट्रान्सपोर्ट कंपनीत कार्यरत होता. प्रकाश सासुरवाडी सोनुर्लीला जात होता.
अपघात झाला असता गावकऱ्यांनी त्वरीत विरुर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधला असता पोलीस निरीक्षक तिवारी यांनी हेड कॉन्स्टेबल नरगेवार व शिपाई खंडाळे यांना घटनास्थळी पाठवीले, पोलीस मोक्यावर पोहचून मृत व्यक्तीला लगेच राजुरा इथे पाचारना करिता राजुरा इथे नेण्यात आले. व पुढील तपास विरूर् पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक कृष्णा तिवारी व पोलीस उपनिरीक्षक वडसकर यांच्या मार्गदर्शनात हेड कॉन्स्टेबल मल्लेश नरगेवार पोलीस सिपाही लक्ष्मीकांत खंडाळे करीत आहे.