Top News

जिल्ह्यातील ग्रामीण भागात अँटीजेन टेस्ट करण्यासाठी दिलेले अंबुलन्स परत पाठविण्यात येऊ नये- आसिफ सय्यद

मा. नामदार श्री. विजय वडेट्टीवार, पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा, यांना ईमेलद्वारे निवेदन करून केली मागणी


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- सध्या देशात तथा राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात टेस्टिंग करून कोरोना रोगाचे निदान लवकरात लवकर झाल्यास सुरुवातीलाच उपचार झाल्यास रुग्ण संख्या आटोक्यात येते.
चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा,जिवती, कोरपना या तीन तालुक्यासाठी एक तसेच बल्लारपूर, वरोरा, चंद्रपूर या प्रत्येकी एक याप्रमाणे या तालुक्यामध्ये 4 गाड्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अँटीजेन टेस्ट करण्यासाठी अंबुलन्स ची व्यवस्था करण्यात आली होती व त्याला लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे.


गावा गावात टेस्टिंग झाली असता मोठ्या प्रमाणात पॉसिटीव्ह रुग्ण सापडण्यास मदत होत आहे. असे असताना देखील मा. सी एस. निवृत्ती राठोड साहेब यांच्याकडून त्या चार तालुक्याला मिळालेल्या गाड्या परत मागण्यात आलेल्या आहेत.
म्हणून राजुरा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आसिफ सय्यद यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री. विजय भाऊ वडेट्टीवार यांना ईमेल द्वारे निवेदन पाठऊन ज्या गाड्या परत मागण्यात आलेल्या आहेत त्या परत करण्यात येवू नये ही विनंती केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने