वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर.

राजकुमार डाखरे यांचा स्तुत्य उपक्रम.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा :- वाढदिवस म्हटलं की पैशाची उधळण, जल्लोषात पार्टी, मित्रांची मैफिल, हे प्रकार साधारणतः बघण्यास मिळतात परंतु आपल्या वाढदिवसाच्या दिवशी रक्तदान शिबिर राबवून वाढदिवस साजरा करणारे अवलीये फार क्वचित च दिसतात .

अश्यातूनच राजुरा येथिल धनोजे कुणबी युवा मंडळ चे माजी अध्यक्ष तथा युवा सामाजिक कार्यकर्ते राजकुमार डाखरे यांनी आपला वाढदिवस कुठेही पैशाची उधळपट्टी न करता रक्तदान शिबिर आयोजित करून साजरा केला.
दिनांक 23 च्या तारखेत शासकीय रक्तपेढी चंद्रपूर येथे रक्तपुरवठा जवळपास सम्पला होता अश्यातच शासकीय रक्तपेढीत काम करणारे राजकुमार यांचे मित्र जय पचारे यांनी सहज त्यांना ही बाब सांगितली ते ऐकताच अवघ्या 4 तासात रक्तदान शिबिराचे आयोजन करून वाढदिवस साजरा केला. या शिबिरात एकूण 15 युवक व युवतींनी रक्तदान केले असून राजकुमार यांच्या पत्नी सौ प्रगती राजकुमार डाखरे यांनी सुद्धा स्वयंप्रेरणेने रक्तदान केले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी सचिन भोयर, राजू निमकर, नरेंद्र काकडे, हरभजन सिंग भट्टी, आशिष वांढरे, केतन जूनघरे, मयूर झाडे, प्रणव मसादे, आदू धोटे, आर्यन देठे, वैभव लांडे,मनोज लांडे,वर्षा बोबाटे, विलास ईद्दे, सुयश बोबडेआदींनी सहकार्य केले.
रक्तदान हे श्रेष्ट दान असून या सामाजिक कार्यात माझ्या वाढदिवसानिमित्त शिबिराचे आयोजन करता आले हे माझे सौभाग्यच प्रत्येक युवकांनी पुढाकार घेऊन रक्तदान करावे असे प्रतिपादन राजकुमार डाखरे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या