वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या महिलेच्या कुटुंबातील व्यक्तींला शासकीय नौकरीवर घ्या.

Bhairav Diwase
युवा सेनेची निवेदनाव्दारे मागणी.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या तालुक्यातील घोट येथील रजनी चिकराम हिच्या कुटूंबातील एका सदस्याला शासकीय नौकरीत सामावून घेऊन त्या कुटुंबाला आधार द्यावा अशी मागणी भारतीय युवा सेनेच्या वतीने येथील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या एका निवेदनातून करण्यात आले आहे.
दि.१९ मे रोजी रजनी चिकराम ही महिला तेंदूपत्ता तोडण्यासाठी गावशेजारच्या जंगलात गेली असता वाघाने तिच्यावर हल्ला करून तिला ठार मारले. मृतक रजनीला दोन आपत्य असून तिचा पती विकलांग असल्यामुळे कुटुंबाची सर्व जवाबदारी तिच्यावरच होती. मोलमजुरी करून ती आपल्या कुटूंबाची उदरनिर्वाह करायची मात्र तिचा मृत्यू झाल्यामुळे तिचे सर्व कुटुंब उघड्यावर पडले असून कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे.त्यामुळे तिच्या कुटूंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत घ्यावे व सध्या तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहसाठी भत्ता द्यावा.अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
सदर निवेदन देतांना युवा सेनेचे जिल्हा प्रमुख हर्षल शिंदे, जिल्हा समन्वयक पप्पू सारवान, तालुका प्रमुख महेश जीवतोडे, कल्याण मंडल, संदीप चटपकर, अमोल कोल्हे, शैलेश पेटकर, केतन तिडके, उमेश काकडे आदी युवसेनेचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.