जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही न झाल्यास आंदोलन करणार - सुरज ठाकरे
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- लवकरच राजुरा नगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहेत म्हणून नगरपालिके द्वारे शहरांमध्ये लोकांकरता सिमेंटचे बाग बनविण्यात आले परंतु ते निकृष्ट दर्जाचे निघाल्याने अर्ध्यावर बाग हे मोडल्या गेले आहेत. याबाबतचा खुलासा सुरज ठाकरे यांनी आज केला व नगरपरिषद ही गेल्या पंधरा वर्षापासून एकाच व्यक्तीच्या हातात असल्याने नगर परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार असल्याचा आरोप सुरज ठाकरे यांनी आज एका पत्रकाद्वारे केला आहे.
राजुरा असिफाबाद रोडवर मलंग-शाह बाबा दर्गा कडे जाण्याचा १२ मीटर रुंद असलेला मार्ग हा राजुरा शहरातील भंगार विक्रेते फारुखभाई यांनी अनधिकृतपणे कब्जा करून ठेवलेला आहे. या संपूर्ण रस्त्यावर दूरपर्यंत भंगार पसरले आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा करून काहीही होत नसल्याने अखेर जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचा दिनांक ७/०१/२०२१ रोजी मुख्याधिकारी नगरपरिषद यांना अतिक्रमणे हटविण्याबाबत पत्र प्राप्त झाले आहे तरीदेखील चार महिन्यांचा कालावधी उलटला यावर देखील नगरपरिषद कार्यवाही करत नसल्याने नगर परिषद ही भंगार व्यावसायिकाला पाठीशी का घालत आहे? हा सवाल सुरज ठाकरे यांनी विचारला आहे.
राजुरा शहराच्या प्रगतीमध्ये अशा पद्धतीने लोक अतिक्रमण करून अडचण घालत असतील तर यांच्यावर कायदेशीर कारवाई का होऊ नये? जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला नगरपरिषद ने केराची टोपली दाखवली जर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांची पूर्तता लवकरात लवकर राजुरा नगर परिषदेने केली नाही तर आंदोलनाचा इशारा युवा स्वाभिमान पक्षातर्फे जिल्हाध्यक्ष श्री.सुरज ठाकरे यांनी आज दिला.