भद्रावतीच्या ग्रामीण रुग्णालयात अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करा.

Bhairav Diwase
आम आदमी पार्टीची मागणी.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- येथील ग्रामीण रुग्णालयात अस्थिरोग तज्ञ डाॅक्टरची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी भद्रावती तालुका आम आदमी पार्टीतर्फे एका निवेदनाद्वारे येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ.मनीष सिंग यांच्याकडे नुकतीच करण्यात आली.

वैद्यकीय अधीक्षकांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भद्रावती शहर हे तालुक्याचे ठिकाण असून या शहरात एकमेव अस्थिरोग रुग्णालय आहे.त्यामुळे या रुग्णालयाची एकाधिकारशाही चालते. या तालुक्यात शंभरच्या वर खेडी आहेत. या सर्व खेड्यांतील व भद्रावती शहरातील अस्थिरुग्णांना उपचारांकरीता चंद्रपूर येथे जावे लागते. त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा खर्च होतो. जर येथील ग्रामीण रुग्णालयात अस्थिरोग तज्ञ डाॅक्टरची व्यवस्था झाली, तर तालुक्यातील गोर-गरीब व मोल-मजुरी करणा-या अस्थिरुग्णांची पैसा व वेळ यांच्या अपव्ययातून सुटका होईल. त्यामुळे येथील ग्रामीण रुग्णालयात अस्थिरोग तज्ञ डाॅक्टरची नियुक्ती करुन अस्थिरोग उपचाराची सेवा उपलब्ध करुन देण्यात यावी,अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि तहसीलदार भद्रावती यांना पाठविण्यात आल्या आहेत.
निवेदन सादर करणा-या शिष्टमंडळात भद्रावती तालुका आम आदमी पार्टीचे अध्यक्ष सोनल पाटील, उपाध्यक्ष विनीत निमसरकर, सूरज शहा, किशोर गायकवाड आणि सूरज पेंदोर सहभागी झाले होते.