अनाथ विद्यार्थांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार.

Bhairav Diwase
युवा सेना जिल्हा प्रमुख हर्षल शिंदे यांचा पुढाकार


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- युवा सेना प्रमुख आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ,युवा सेना सचिव वरुण सरदेसाई आणि चंद्रपूर जिल्ह्याचे संपर्कमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन चंद्रपूर युवा सेना जिल्हा प्रमुख हर्षल शिंदे आणि शिंदे परिवार भद्रावती यांनी कोरोनामुळे आई-वडील गमाविलेल्या भद्रावती व वरोरा तालुक्यातील अनाथ मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे.
कोरोना च्या दुसऱ्या लाटेत अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत.अनेक घरातील कर्ता पुरुष आणि महिला यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या घरातील मुलां समोर भविष्याचा शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये यासाठी युवा सेना जिल्हाप्रमुख हर्षल शिंदे व भद्रावती शहरातील शिंदे परीवार सामाजिक दायित्व राखून आपण समाजाला काही देणे लागतो या भावनेतून त्यांच्या शिक्षणाची जबाबदादारी घेत आहेत.त्यामुळे वरोरा व भद्रावती तालुक्यातील कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुला-मुलींनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी युवासेना जिल्हा प्रमुख हर्षल शिंदे (मो.नं.९९६०५९६७७७) किंवा जिल्हा समन्वयक तथा नगरसेवक पप्पू सारवन (मो.नं.९१५८५८५३८३) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन युवासेना जिल्हाप्रमुख हर्षल शिंदे यांनी केले आहे.