सावली:- सर्वत्र कोरोना विषाणूने थैमान घातले असून लाखो लोकांना आपले जीव देखील या विषाणू मुळे गमवावे लागले आहेत. अशातच सावली तालुक्यातील सोनापूर गावावर तापाचे सावट पसरले असून प्रत्येकाच्या घरोघरी तापाची साथ पसरलेली आहे.
वेळीच प्रशासनाने लक्ष न दिल्यास ही साथ आणखी वाढून परिस्थिती हाता बाहेर जाऊ शकते. त्यामुळे आरोग्य विभागाने तात्काळ लक्ष घालून गावात आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. गावातील काल एका युवकाच्या कोरोनामुळे बळी गेल्यामुळे गावात अजूनच भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.