मानोली उपकेंद्रात आजपासून कोविड प्रतिबंधक लस मिळण्याला सुरुवत
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- कोरोनाचा ग्रामीण भागात वाढता प्रादुर्भाव पाहता मानोली उपकेंद्रात दि.16/05/2021 ला कोविड प्रतीबंधक लस मिळणार आहे. अनेक दिवसापासून मागास ग्रामीण भागातील लोकांना लसीकरनासाठी बाहेरील शहरात कींवा phc ला जाऊन लस घ्यावी लागत असे व लस न मिळाल्यास परत यावे लागायचे.
ही समस्या पाहता परीसरातील जास्तीत जास्त लोकांना लसीकरन व्हावे यासाठी आरोग्य विभागाकडे वामन तुराणकर यांनी लसीकरनाची मागणी केली. त्यांच्या मागणीला यश मिळत दी.16/05/2021 ला लसीकरन चालु करण्यात येणार आहे. त्यामुळे गावातील नागरिकांनी लस घेऊन कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी मदत करावी व याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा अशी विनवणी वामन तुराणकर यांनी केले.