Top News

घोडाझरी तलावातून बिना परवाना अवैध उत्खनन करून शासनाला लाखो-करोडोंचा चुना?

महसुल व वन विभागाची अनभिज्ञ असल्याची बतावणी


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
नागभीड:-नागभीड नगपरिषद च्या पिण्याच्या पाणी पुरवठ्याच्या सुरू असलेल्या घोडाझरी तील बांधकामा करिता कंत्राटदारा द्वारे मुरमाचे अवैध उत्खनन व वापर सरु असुन नियम धारेवर ठेउन बळजबरीने मुरुमाने भरलेला हायवा ट्रकची घोडाझरी तलावाच्या मुख्य पाळीवरून वाहतूक सुरु आहे.
सध्या घोडाझरी अभयारण्य वृक्षतोडी आणि तस्करी, वनवा, मोहफूल दारूनिर्मिती, याकरिता चर्चेत आहेच . मात्र एवढ्यावरच नाही तर घोडाझरी तलाव परिसरात या लॅाकडाऊन चा फायदा उचलत . घोडाझरी तलावाचे पाणी अभयारण्यातून पाइपलाइनद्वारे नागभीड शहराला पिण्याकरिता पुरवठा करण्यात येणार आहे. आणि या नगर परिषदच्या कामाकरिता एका कंत्राट कंपनीद्वारे सध्या हे काम मोठ्या जोरा-सोरात लॅाकडाउनचा फायदा उचलत, चोरीचा खनिज वापरून व नियम बाह्य काम करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे . आणि याकडे लक्ष द्यायला कोणत्याही विभागाला कोरोना काळामुळे थोडी ही वेळही नाही आहे असे दिसून येत आहे.


याच काळात लॅाकडाउन चा फायदा उचलून या बांधकामातील कंत्राट कंपनीद्वारे कुठल्याही विभागाची परवानगी न घेता थेट घोडाझरी तलावातून अवैध पद्धतीने मोठमोठाल्या मशनरी व हायवा ट्रक च्या साह्याने मुरमाची अवैद्य वाहतूक केली जात आहे. व यातही भर म्हणजे घोडाझरी तलावाच्या मुख्य पाळीच्या खालच्या भागातून चार चाकी वाहनांना वाहतुकीकरिता सिमेंट काँक्रेट चा पक्का रस्ता बनविलेला आहे.
मात्र अवैध मुरमाची वाहतूक करणारे ट्रक हे तलावाच्या मुख्य पाळीने मुरुमाची डुलाई करत आहेत . या मुळे या तलावाच्या पाळीची मोठी हानी होऊन पावसाळ्यात पाळ फुटण्याची शक्यता व त्यामुळे लाखो लोकांची जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. तसेच या घोडाझरी तलावाच्या मुख्य पाळीच्या गर्भातूनच घोडाझरीचा मुख्य कालवा गेलेला आहे.
तो शेकडो वर्षापूर्वी इंग्रजांनी दगडांनी बांधलेला आहे व त्याचे वरूनच १०-२० टन वजन घेऊन हायवा ट्रक ची वाहतूक होण्यामुळे भविष्यात सिंचन विभागाची व परिसरातील जनतेची न भरून निघणारी दुर्घटनेतून मोठी हानी टाळता येणे शक्य होणार नाही. ही गंभीर बाब असून यावर काय कार्यवाही करन्यात येनार आहे? याबाबत कुतुहल आहे.
          असाच आज एक मुरुमाची अवैधरीत्या कुठलाही  परवाना नसलेला एक ट्रक क्र.MH-33-T-6999 हा घोडाझरी तलावाच्या मुख्य पाळीवरून येत असताना सिंचन विभागाची अधिकारी श्री उगडे साहेब यांनी अडविला व अवैधरीत्या होणारी मुरुम वाहतूक थांबवली.
           मात्र चोरीच्या नियमबाह्य पद्धतीने होणाऱ्या व शासनाला लाखो करोडो रुपयाचा राजस्व घडविणाऱ्या कंत्राटदारावर मोठी कारवाई व्हायला हवी असे परिसरातील लोकांचे मत आहे . याबाबत चौकशी केली असता सिंचन विभागाद्वारे "आम्ही बांधकाम करताना तलावाच्या पाळीने कुठलीही वाहतूक करण्याची व तलावातून मुरूम उत्खनन करण्याची परवानगी दिलेली नाही" असे सांगण्यात आले. तर तहसील वन कार्यालयाशी संपर्क साधला असता "या बांधकामाकरिता मुरूम उत्खननाची व वाहतुकीची आमच्याकडूनही कुठलीही परवानगी घेतलेली नाही" असे कळविण्यात आले . मात्र हे काम जरी नागभीड नगरपंचायत करीता असले तरी , या कामाकरिता नियुक्त ठेकेदाराने संबंधित विभागाला व शासनाला अंधारात ठेवून लाकडाउन व दुर्लक्षित अभयारण्यातील परिस्थितीचा फायदा उचलत  मुरमाची वाहतूक व वापर करून राजस्व विभागाला लाखो - करोडो रुपयाचा चुना लावलेला आहे,  हे निदर्शनास येते.  याकरिता संबंधित कंत्राटदारा च्या या कामाची सखोल व गांभीर्याने चौकशी होऊन कंत्राटदारावर संबंधित विभागाद्वारे योग्य ती कठोर दंडात्मक कारवाई करायला हवीच.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने