प्रशासनाने उपोषण न करता सहकार्य करण्याची केली विनंती.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- राज्यात व चंद्रपूर जिल्ह्यात कोरोणाचे संकट गंभीर झाले आहे. राजुरा सारख्या तालुक्यात व विधानसभा क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. वेळीच उपचार मिळत नसल्यामुळे अनेक रुग्ण दगावत आहेत .कोरोना संकटात गंभीर रुग्णांना पुरेसे वेंटिलेटर व ऑक्सिजन युक्त बेड उपलब्ध करून देण्याची मागणी घेऊन माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी आज दिनांक पाच मे रोजी बेमुदत उपोषण जाहीर केले होते मात्र प्रशासनाने याची दखल घेत संकटकाळात उपोषण मागे घ्यावे प्रशासनाला सहकार्य करावे . आपण केलेल्या मागण्यांचा पाठपुरावा वरिष्ठ स्तरावर करीत असल्याचे लेखी पत्र देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली त्याअनुषंगाने माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी उपजिल्हा रुग्णालय राजूरा येथे आयोजित बेमुदत उपोषण स्थगित केले आहे. सर्व हितचिंतक व कार्यकर्त्याने प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
कोरोना बाधीत गंभीर रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी तात्काळ ऑक्सिजन युक्त बेड, पुरेसे व्हेंटिलेटर प्रशासनाने उपलब्ध करून द्यावे यासाठी 30 एप्रिल रोजी माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले होते. त्या अनुषंगाने ४ मे पर्यंत व्यवस्था न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला होता. निवेदनानंतर जिल्हा प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींनी उद्योगांच्या प्रतिनिधींशी तात्काळ बैठक लावली एवढेच नव्हे तर ऑक्सीजन सिलेंडर पुरवठा करण्यासाठी उद्योगानी पुढाकार घेतला व प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला. ही आंदोलनाची यशस्विता आहे.संकट स्थितीमध्ये संकटकाळात निष्पाप रुग्णांचे जीव वाचावे यासाठी प्रशासनाला जागे करण्याचा माझा प्रयत्न आहे. तालुक्यात ऑक्सिजन अभावी मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या ही अत्यंत हृदय हेलावणारी आहे. ऑक्सिजन लेवल 50 च्या खाली आलेले रुग्ण राजुरा येथील कोवीड सेंटरमध्ये दाखल आहेत, ज्याअर्थी त्यांना व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे.
ऑक्सिजन लेवल असल्यामुळे अनेक गंभीर रुग्ण मृत्यूच्या दाढेत संघर्ष करीत आहेत. चंद्रपूर येथे ऑक्सिजन व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नाहीत. जीव वाचवण्यासाठी बाहेरच्या राज्यात उपचारासाठी जावे लागत आहे. अशा स्थितीमध्ये प्रशासनाने रुग्णांना उपचार देण्यासाठी तात्काळ पावले उचलावीत. याबाबत प्रशासनाने सकारात्मक कारवाई करण्याचे आश्वासन दिले. कोवीड रुग्णांचे जिव वाचवण्यास प्राधान्य देऊन प्रशासनाने याबाबत पाठपुरावा वरिष्ठ स्तरावर करण्यात येत असल्याचे लेखी पत्र तहसीलदार यांनी दिल्यामुळे प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी आंदोलन मागे घेण्याची माहिती माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी दिली.