Top News

जिल्हा समाजकल्याण तर्फे कोरोना रूग्णांना अपूरे जेवण.

नगराध्यक्षा प्रा. रत्नमाला भोयर संतापल्या.

मुलच्या कोविड केअर सेंटर येथील प्रकार.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
मुल:- मुल येथील कोविड केअर सेंटरना स्थानिक प्रशासनाकडून जेवणाची उत्कृष्ट व्यवस्था असताना जिल्हा प्रशासनाने समाज कल्याणच्या माध्यमातून जेवणाचे कंत्राट दिले. या कंत्राटदाराने अपुरे, निकृष्ट आणि उशिरा जेवण दिल्याने कोविड केअर सेंटर वर उपचार घेणाऱ्या रुग्णांनी प्रचंड रोष व्यक्त केला. यामुळे तातडीने तालुका प्रशासनाने आधीच्याच कंत्राटदार मार्फत जेवण पुरविण्याचे आदेश दिलेत.
मूल येथील कोवीड केंद्रातील रूग्णांना उशिरा दुपारी दोन वाजताच्या सुमारास अपूरे आणि मोजके जेवण दिले गेले. अर्ध्यापेक्षा अधिक रुग्णांना जेवणही मिळाले नाही. त्यामुळे आज रविवारला येथील नगर पालिकेच्या प्रशस्त शाळा इमारतीतील रूग्णांमध्ये गोंधळ उडाला. त्यांनी प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला. झालेल्या प्रकारामुळे प्रशासनामध्ये सुदधा खळबळ निर्माण झाली. जेवणासाठी रूग्णांच्या आरोग्याशी खेळणार्‍या संबधीत कत्रांददाराची उचलबांगडी करून प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.
कोरोना केंद्रावरील रूग्णांना प्रोटीनयुक्त आहार मिळावे यासाठी जिल्हा प्रशासनानाच्या वतीने जिल्हा समाजकल्याण विभागाला सूचना देण्यात आल्या. त्यांच्या माध्यमातून कोवीड सेंटर मधील रूग्णांना जेवण मिळावे अशी तरतूद करण्यात आली. समाजकल्याणच्या माध्यमातून मूल मध्ये जेवण वितरण करण्यासाठी एका मसराम नामक कत्रांटदारास कंत्राट दिला होता. परंतु त्याचे नियोजन पहिल्याच दिवशी चुकले. मूल येथे तीन कोवीड केअर सेंटर आहेत.
त्यापैकी नगर पालिकेच्या नवीन शाळेतील प्रशस्त इमारतीतील कोवीड सेंटर मध्ये येथिल रूग्णांना उशिरा दुपारी दोन वाजताच्या सुमारास जेवण अपूरे आणि मोजकेच मिळाले. त्यामुळे बर्‍याचशा रूग्णांना अर्धपोटी राहावे लागले. भूकेल्या पोटी त्यांच्यात प्रशासनाविरोधात रोष निर्माण झाला. या कोवीड सेंटर वर 122 रूग्ण उपचार घेत आहेत. येथिल काही रूग्णांनी मूलच्या नगराध्यक्षा रत्नमाला भोयर आणि प्रभाकर भोयर यांच्या कडे तक्रार केली. त्यांनी तात्काळ कोवीड सेंटरला भेट दिली असता रूग्णांच्या तक्रारी ऐकून तेही अवाक झाले. तालुका आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिकार्‍यांना सुदधा पाचारण करण्यात आले.
समाजकल्याणच्या जेवणाला पहिल्याच दिवशी गोंधळ उडाल्याने घटनास्थळी नगर पालिकेचे मुख्याधिकारी मेश्राम, नायब तहसिलदार पवार तात्काळ उपस्थित झाले. घटनेची शहानिशा करून संबधित कत्रांटदाराचे चुकलेले नियोजन लक्षात घेवून अधिकार्‍यांनी मसराम यांचे कत्रांट रदद केले. पूर्वीच्याच नामदेव नामक जेवण वितरण करणार्‍या ठेकेदाराकडे जेवणाची जबाबदारी दिल्याचे नायब तहसिलदार पवार यांनी आमचे प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. यावेळी मूल नगर परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, सभापती प्रशांत समर्थ यांनीही भेट दिली.
आज पर्यंत मूल येथील नगर पालिकेच्या माध्यमातून कोवीड सेंटरवरील कोरोना बाधीत रूग्णांना जेवण देण्यात येत होते. दोन वेळ जेवण, सकाळी चहा, नास्ता असा रोजचा जेवणाचा दिनक्रम राहत होता.

कोवीड सेंटर वर शहरीसह ग्रामिण भागातील रूग्ण आहेत. त्यांना हलके फुलके आणि अपूरे जेवणावर त्यांचे पेट भरत नाही. त्यांना दोन्ही वेळेवर पोटभर जेवण आणि चहा नास्ता द्या. जेवण वितरण संदर्भात जिल्हा प्रशासनाने जिल्हा समाजकल्याण विभागाला याचे टेंडर दिले होते. आज जेवण वितरण करण्याचा त्यांचा पहिलाच दिवस होता. जेवण वितरण करणार्‍या संबधित ठेकेदाराचे नियोजन चुकल्याने कोवीड सेंटर वर रूग्णांना अर्धपोटी राहावे लागले आणि गोंधळ उडला. कोरोनाच्या लढयासाठी रूग्णांना प्रोटीन युक्त जेवण मिळणे आवश्यक आहे.
प्रा. रत्नमाला भोयर,
नगराध्यक्षा, मूल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने