मुख्य लेखापालाचा हत्तीच्या हल्यात दुदैवी मृत्यु झाल्या प्रकरणाची सखोल चौकशी करा

Bhairav Diwase
महाराष्ट्र राज्य सुरक्षा व कंत्राटी कर्मचारी संघटनेचे जिल्हा महासचिवाचे मुख्य वनसंरक्षक यांना निवेदन


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर : ०६मे २०२१ रोजी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प येथील कोर क्षेत्र कोळसा (बोटेझरी) हत्ती कॅम्प येथे वनविभागाचे मुख लेखापाल प्रमोद गौरकार याचा हत्ती (गजराज) याच्या हल्यात दुदैवी मृत्यु झाला हि घटना आकस्मीत नसुन वनविभागाच्या वरीष्ठ अधिकारी ए.सी.एफ कुलकर्णी (कोर) याच्या निष्काळजीपणा व लापरवाही मुळे घटना घडण्यात आली आहे. या प्रकरणाला ताडोबा व्याघ्र प्रकल्प येथील वरीष्ठ अधिकारी हे लपविण्याचा प्रयत्न करीत आहे. सदर अपघातात मृत्यू झालेल्या प्रमोद गौरकार यांची चौकशी करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य सुरक्षा व कंत्राटी कर्मचारी संघटनेचे जिल्हा महासचिव अमोल मेश्राम यांनी मुख्य वनसंरक्षक यांना निवेदनातून केली आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प येथील कोर क्षेत्र असलेल्या बोटेझरी हत्ती कॅम्प येथे वनविभागाचे मुख्य लेखापाल कशासाठी गेले हे अद्यापही उलगडा झाला नाही. तसेच विभागीय कार्यालयातला कुठलाही लेखापाल हा फिल्डवर विभागीय कार्यालयाचे कामकाज सोडून गेले कसे यांची परवानगी त्यांनी घेतली होती काय ?ज्या भागात गेले तो बोटेझरी हा नो मॅन ल्यॉड आहे तिथे एकतर माणव वस्ती नाही किंवा कोणतेही डिर्पाटमेटल किवा कार्यालयीन ऑफीस नाही मुख्य लेखापालला मग जाण्याचा कारण काय ? अशा प्रकारे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत असून लेखापाल प्रमोद गौरकार यांच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचार्‍यांवर उचित कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य सुरक्षा व कंत्राटी कर्मचारी संघटनेचे जिल्हा महासचिव अमोल मेश्राम यांनी केली आहे. यावेळी निवेदनाप्रसंगी जिल्हा महासचिव अमोल मेश्राम, शहर प्रमुख महेंद्र ठाकूर, तालुका प्रमुख पप्पू यादव पर्यावरण प्रेमी चंदन सपाट आदी कार्यकर्ते उपस्थित होते.