वरोरा:- आज दिनांक 13 मे ला दुपारनंतर 4 ते 4-30 वाजेच्या दरम्यान वरोरा शहराच्या गांधी चौका परिसरात सूकराम आलम या 26 वर्षीय युवकाचा चाकूने गळ्यावर वार करून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे आरोपीचे नाव निलेश ढोके या 19 वर्षीय असे आहे.
सूकराम वसंत आलम राहणार अंबादेवी वार्ड असे मृतकाचें नाव असून तो पाहुणा येथील रहिवाशी आहे. त्याचे निलेश ढोकेया 19 वर्षीय युवकाशी भांडण झाले असता निलेशने खिशातील चाकू काढून सूकराम च्या सरळ गळ्यावर वार करून जागीच ठार केले. पोलिसांना माहीती मिळताच ते घटनास्थळी पोहचले व आरोपी निलेश ला ताब्यात घेतले आहे. सूकराम चे नुकतेच काही वर्षापूर्वी लग्न झाले असल्याचे बोलल्या जात आहे. या भरदिवसा झालेल्या खुनामुळे शहरातील वातावरण तापले असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे संकेत मिळत आहे.