जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🖼️
🖼️🇮🇳
🇮🇳✌️

✌️

✌️


🎂 🎂🎂🙏🟥

राज्यात कडक लॉकडाउन नाही मात्र निर्बंध कायम राहणार:- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.


राज्यात 15 जूनपर्यंत निर्बंध वाढण्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांचे संकेत.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
मुंबई:- राज्यातील कोरोना परिस्थिती बघता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन आणखी 15 दिवसांसाठी वाढवला आहे. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन हा आता 15 जूनपर्यंत असणार आहे. मे महिन्यात काही जिल्ह्यांमधील परिस्थितीत नियंत्रणात आली तर काही ठिकाणी रुग्णसंख्येत वाढ झाली. त्यानुसार लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात येणार आहे. तसेच ज्या भागात रुग्णसंख्या वाढत आहे त्या भागातील निर्बंध आणखी कडक करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या काही प्रमाणात खाली आली आहे. पण आपण अद्यापही कोरोनाच्या नव्या विषाणूवर ताबा मिळवू शकलेलो नाही. अशा परिस्थितीत तिसरी लाट आली तर सर्व कठीण होऊन बसेल. आपण रुग्णालये, बेड्स, ऑक्सिजन सर्व व्यवस्था उभी करण्याता प्रयत्न करु. पण तरीही कोरोनाचा नवा म्युटेट आणि तिसरी लाटचा सामना करणं कठीण होईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी रविवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत