पोर्टल बियाने या घटकासाठी शेतकऱ्यांचे अर्ज घेण्यास सुरुवात.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- महा डीबीटी पोर्टलवर "शेतकरी योजना" या सदराखली शेतकऱ्यांच्या सोयिकारिता सर्व योजनाचा लाभ एकाच अर्जादवारे अर्ज करण्यापासुन ते प्रत्यक्ष लाभ मिळे पर्यंत एकत्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. या प्राणालीद्वारे शेतकर्ऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबीच्या निवडीचे स्वातंत्र देण्यात आले असून शेतकर्ऱ्यांनी शेती निगडित विविध बाबीकारिता अर्ज करावयाचा आहे.
राज्य शासनाच्या महा- डीबीटी पोर्टल वर शेतकरी योजना या शीर्षकाअंतर्गत "बियाँने" या घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा करुण देण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत लाभर्थीनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान या योजनेतील सोया, भात, तूर, उडिद , मका, बाजरी, ईत्यादी अनुदानावर बियाणे उपलब्ध होणार असून १५ मे २०२१ पर्यंत शेतकर्ऱ्यांणे अर्ज करने बंधनकारक आहे. वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी जवड च्या सामुदायिक सेवा केंद्र इथे जाऊन अर्ज करू शकतात. तरी जास्तीत जास्त लोकांनी लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.