Top News

जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांच्या हस्ते मारोडा येथे मास्क व सॅनिटाईजर वाटप.

मास्क वापरा, सुरक्षित रहा, काळजी घ्या. जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांचे आवाहन.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
मुल:- तालुक्यातील मारोडा येथे आज जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांच्या हस्ते मास्क व सॅनिटाईजर वाटप करण्यात आले. सध्या चंद्रपुर जिल्ह्यामध्ये कोविड-19 चे दररोज ५००, १००० ते १२०० चे रुग्ण आढळून येत असून ग्रामीण भागामध्ये सुद्धा कोरोना या महामारीने सर्वांना घाबरून सोडले आहे. दररोज वेगवेगळे आकडे बघायला मिळत आहे त्यामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोणीही कामा व्यतिरिक्त बाहेर पडू नये.
सर्वांनी मास्क, सॅनिटाईजर आणि सामाजिक अंतर या त्रिसुत्री चे पालन करावे, आपल्याला कोरोणाचे चे लक्षण आढळून आल्यास कोणीही घाबरून न जाता त्वरित दवाखान्यात जाऊन आपली तपासणी करून घ्यावी व सर्वांनी सुरक्षित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी केले आहे.
यावेळी ग्राम पंचायत मारोडा येथील सरपंच श्री. भिकारूजी शेंडे, भाजपा युवा कार्यकर्ते श्री. नरसिंगजी गणवेलवार, श्री. सचिनजी गुरनुले उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने