💻

💻

तालुका स्तरावरील आरोग्य यंत्रणा अधिक प्रभावी करा:- खासदार बाळू धानोरकर.

कोठारी, पोंभुर्णा, मूल, गोंडपिपरी येथील आरोग्य यंत्रणेची पाहणी.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. मोठ्या प्रमाणात बाधित होणाऱ्या रुग्णाची संख्या वाढत आहे. त्यासोबतच मृत्यू देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रुग्णांचे विलगीकरण करण्याची प्रक्रिया व त्यांच्यावर उपचार करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय तसेच इतर ठिकाणी कोरोनावर उपचार करण्याकरिता आरोग्य विभागाने अधिक प्रभावी कोरोना सेंटर्स उभारावे जेणेकरून चंद्रपूर येथील आरोग्य यंत्रणेवर येणार ताण कमी होऊन तालुका स्तरावरच कोरोना बाधितांवर उपचार होईल. त्यामुळे तालूका स्तरावरील आरोग्य व्यवस्था प्रभावी करण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी केल्या आहे. त्यांनी कोठारी, पोंभुर्णा, मूल, गोंडपिपरी येथील आरोग्य यंत्रणेची पाहणी करत असताना तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
आरोग्य वर्धिनी केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र कोठारी येथे खासदार बाळू धानोरकर यांनी पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी ढवळे, काँग्रेसचे जेष्ठ नेते विनोद दत्तात्रय, विनोद बुटले, पोलीस निरीक्षक चव्हाण, डॉ. प्रांजली गुजर, मो. फारूक यांची उपस्थिती होती. यावेळी लसीकरण पु. २५८ व स्त्रीया २५१ तर दसऱ्या डोज मध्ये ५२५ पळसगाव ७६ लसीकरण करण्यात आले. त्यासोबत गोंडपिपरी येथील आदिवासी मुलीचे शासकीय वसतिगृह येथे भेट दिली. येथे डॉक्टर, नर्स, सफाई कामगार, ऑसीजन बेड्स वाढविण्याच्या सूचना केल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी ढवळे, काँग्रेस तालुका अध्यक्ष तुकाराम झाडे, तहसीलदार कमलाकर मेश्राम, डॉ. संदीप बोबडे, शहर अध्यक्ष देवेंद्र बट्टे, गौतम झाडे, कमलेश निमगडे यांची उपस्थिती होती. पोंभुर्णा येथील ग्रामीण रुग्णालय येथील नवीन इमारतीत कोविड सेंटर वर भेट दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी ढवळे, तहसीलदार निलेश खटके, डॉ. मामीडवार, उपविभागीय अभियंता टांगले, काँग्रेस तालुका अध्यक्ष कवडूजी कुंडावर, अतिक कुरेशी, साईनाथ शिंदे, जयपाल गेडाम, सोमेश्वर कुंदोजवार, विनायक बुरांडे, पराग मूलकलवार यांची उपस्थिती होती. मूल येथे कोविड केअर सेंटर ला भेट दिली. येथील अस्वच्छतेवर खासदार बाळू धानोरकर यांनी नाराजी दर्शविली. तसेच रुग्णांना जेवणात पौष्टीक पदार्थ देण्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपविभागीय अधिकारी खेडकर, गटविकास अधिकारी हेमंत कळसे, वैद्यकीय अधिकारी उज्वल इंदोरकर, डॉ. पूजा महेशकर, काँग्रेस अध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, पोलीस निरीक्षक राजपूत, न. प. अधिकारी मुळे यांची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत