जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏 🙏

🙏 🙏✨

✌️

जिल्ह्यात सिंघम अवतरणार; त्वरित पोलिस मदत मिळणार.

पोलीस सेवेत 15 नवीन बोलेरो वाहन दाखल.

आपत्कालीन परिस्थितीमध्ये तात्काळ मदत हवी असल्यास ११२ नंबरची हेल्पलाईन कार्यान्वित.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- आपत्कालीन परिस्थितीत गरजूंना तत्काळ मदत देता यावी, या उद्देशाने ११२ नंबरची हेल्पलाईन राज्यभरासह चंद्रपूर जिल्ह्यातही कार्यान्वित करण्यात आली आहे. चंद्रपूर पोलीस कंट्रोल रूममध्ये या संदर्भातील प्रणाली जोडण्यात आली आहे. या हेल्पलाईनवर आपत्कालीन परिस्थितीतील अडकलेल्या व्यक्तीचा कॉल येताच त्याचे जीपीएस लोकेशन त्वरित कळणार असल्याने पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी वेळीच घटनास्थळी पोहोचूून मदत करणार आहेत. सर्व वाहने मिळाल्यानंतर व तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर दहा मिनिटात संबंधित पथक पोहणार आहे. ही हेल्पलाईन वरदान ठरणार आहे.
दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांनुसार आपत्कालीन प्रतिसाद साहाय्य प्रणाली (ईआरएसएस) निर्मितीचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कोणत्याही व्यक्तीला आपत्कालीन परिस्थितीमध्ये तत्काळ मदत हवी असल्यास ११२ नंबरची हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात आली.
यासंदर्भातील सर्व प्रणाली पोलीस कंट्रोल रूममध्ये जोडण्यात आली आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत असलेल्या व्यक्तीने फोन लावल्यावर अवघ्या काही सेकंदात हा फोन कुठून आला, हे कळणार आहे. त्यानंतर तेथील पोलीस नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल, महिला हेल्पलाईन, चाईल्ड हेल्पलाईन यांना एकाच वेळी सदर कॉलची माहिती दिली जाणार आहे. त्यानुसार घटनेचे गंभीर्य लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल होऊन आपत्कालीन परिस्थितीत असलेल्या व्यक्तीला मदत करू शकतील.
जिल्ह्यात एकूण ३२ पोलीस ठाणे आहेत. त्यात १९४ पोलीस अधिकारी व २५०० कार्यरत आहेत. यापैकी ४७० पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांच्या दिमतीला जिल्हा नियोजनाच्या विकास निधीतून १५ अद्यावत वाहने देण्यात आली आहेत. यासोबत निधी आल्यानंतर पुन्हा काही चारचाकी व दुकाही वाहने खरेदी करण्यात येणार आहेत. ही वाहने प्रत्येक तालुका मुख्यालयी राहणार असून ११२ नंबरवर कॉल येताच वेळीच घटनास्थळ गाठून मदत करणार आहेत. त्यामुळे ही हेल्पलाईन वरदान ठरणार आहे.
_____________________________________

कॉल येताच कळणार लोकेशन......

आपत्तीमध्ये मदत मागणाऱ्याने ११२ वर कॉल केल्यावर तो कॉल राज्यातील कॉल सेंटरला जाईल. त्यानंतर तेथून संबंधित जिल्ह्यातील म्हणजे महसूल, पोलीस फायद ब्रिगेड आदींशी संबंधित असल्यास पोलीस विभागाकडून त्या परिसरातील बिट मार्शलकडे जाईल. नंतर कर्मचारी घटनास्थळी पोहोचल्यावर जीपीएसवर नोंद होईल आणि तक्रारीचे निवारण करण्यात येईल.
___________________________________

५० चारचाकी, ८२ दुचाकीची मागणी......

आपत्तीमध्ये सापडलेल्यांपर्यंत तातडीने पोहोचता यावे, यासाठी ५० चारचाकी वाहने व ८२ दुचाकी वाहनाची मागणी करण्यात आली आहे. त्यापैकी जिल्हा नियोजनाच्या विकास निधीतून १५ व इतर ५ असे एकूण २० अद्यावत वाहने मागील काही दिवसांपूर्वी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत पोलीस विभागाकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे निधीची तरतूद झाल्यानंतर पुन्हा आणखी काही वाहने तसेच दुचाकी खरेदी करण्यात येण्याची माहिती आहे.
_______________________________

४७० पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण......

'सेंट्रलाईज कंट्रोल रूम'ला फोन आल्यावर कसा प्रतिसाद द्यायचा, कंटोल रूमला फोन आल्यावर काय प्रक्रिया करायची, आपत्तीमध्ये कशी मदत करायची याबाबत जिल्ह्यातील ४७० पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
आपत्कालिन परिस्थितीमध्ये अडकलेल्यांना पोलिसांची मदत घेता यावी, यासाठी ११२ क्रमांकाची हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. याबाबतची प्रणाली पोलीस कंट्रोल रुमला जोडण्यात आली आहे. हेल्पलाईनवर तक्रार आल्यानंतर तत्काळ दखल घेतली जाणार आहे. या प्रणालीमुळे नागरिकांना तक्रारींना जलद प्रतिसाद देता येईल, आणि लोकाभिमुख काम करण्यास पोलिसांना मदत होईल.
अरविंद साळवे,
जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रपूर.
__________________________________

पोलिसांची मदत हवी असल्यास ११२ डायल करा....

जिल्ह्यातील कुठल्याही गावातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ पोलिसांची मदत हवी असल्यास त्यांनी ११२ नंबर डायल करायचा आहे. त्यापुढच्या अवघ्या १० मिनिटांमध्ये पोलीस मदतीला धावून येतील, असे नियोजन करण्यात येत आहे. नवा हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्याची प्रक्रिया जवळपास लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. लवकरच ही सुविधा जिल्हाभरात पुरविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत