Top News

पोलिसांनी केले ४१ लाखाचे गावठी दारुचे साहित्य नष्ट. Police

नाकाबंदीत १० लाख ५१ हजाराचा मुद्देमाल जप्त.

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- भद्रावती शहरात कडक लाॅकडाऊन चालू असल्याने देशी-विदेशी दारु सहज मिळणे कठीण झाल्याने गावठी दारुचा महापूर आल्याचे भद्रावती पोलिसांना माहित होताच त्यांनी नजिकच्या बरांज तांडा परिसरात धाड टाकून ४१ लाख ९० हजाराचे गावठी दारुचे साहित्य नष्ट केले.
  प्राप्त माहितीनुसार, राज्यात लाॅकडाऊन सुरु होताच भद्रावती शहरात अवैध मार्गाने मिळणा-या  देशी-विदेशी दारुचे भाव गगनाला भिडले. त्यामुळे अनेक तळीरामांनी आपला मोर्चा नजिकच्या बरांज तांडा वस्तीत मिळणा-या गावठी दारुकडे वळविला. त्यामुळे बरांज तांडा परिसरात जंगलाच्या आसऱ्याने गावठी दारु गाळणारांचे मोठे पिक आले. ही बाब पोलिसांना माहित होताच जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, वरोरा उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सुनील सिंग पवार, गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक अमोल तुळजेवार, पो.शि. केशव चिटगिरे, निकेश ढेंगे, हेमराज प्रधान आणि शशांक बदामवार यांनी दि.२६ ते २८ एप्रिलपर्यंत बरांज तांडा परिसरात विशेष मोहिम राबविली. या मोहिमेत गुळ दारु, गुळ सडवा आणि गुळ दारु गाळण्याचे साहित्य असा एकूण ४१ लाख ९० हजाराचा मुद्देमाल जागीच नष्ट केला. 
                    
        दरम्यान दुस-या एका घटनेत दि.३ मे रोजी पोलिसांना अगदी सकाळी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे चंद्रपूर-नागपूर महामार्गावर एन.टी.पी.सी.जवळ केलेल्या नाकाबंदीदरम्यान देशी दारुसह १० लाख ५१ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 
                         
       एम.एच.३१, ई.क्यू.०५३४ क्रमांकाची शिवरलेट कार नागपूर वरुन अवैधरित्या देशी दारु घेऊन चंद्रपूरच्या दिशेने निघाल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.त्यानुसार सकाळी ६ वाजता एन.टी.पी.सी.जवळ नाकाबंदी करण्यात आली.दरम्यान,सदर शिवरलेट कारच्या चालकाने पोलिसांना पाहुन भरधाव वेगाने आपली कार दमटली. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता कार दूरवर थांबवून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले. त्याच्या कारची झडती घेतली असता कारमध्ये २ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या ९० मि.लि. मापाच्या संत्रा देशी दारु राॅकेटच्या २ हजार५०० निपा २५ खर्ड्याच्या बाॅक्समध्ये आढळून आल्या. ही सर्व दारु, १ हजार रुपयाचा भ्रमणध्वनी संच आणि ८ लाख रुपये किंमतीची शिवरलेट कार असा एकुण १० लाख ५१ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी कारचालक श्रीकांत रमेश समर्थ (२४) रा. जुना बाबुळखेडा, नागपूर याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने