जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏

🙏🏻

पोंभुर्णा तालुक्याच्या सुरक्षेच्या उद्देशाने गर्दीच्या ठिकाणी सॅनिटायझर लिक्विड व फेस शिल्ड मास्क चे वाटप.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- आ. सुधीर मुनगंटीवार विद्यमान अध्यक्ष लेखा समिती महाराष्ट्र राज्य यांच्या पुढाकारातून तथा भाजपा जिल्हा अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात पोंभुर्णा तालुक्याच्या सुरक्षेच्या उद्देशाने गर्दीच्या ठिकाणी सॅनिटायझर लिक्विड व फेस शिल्ड मास्क चे वाटप करण्यात आले.

पोंभुर्णा पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय, कोविड सेंटर, इंडियन बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, देवाडा येथील विदर्भ कोकण बँक, नवेगाव मोरे येथील बँक ऑफ इंडिया शाखेत तसेच आरोग्य उपकेंद्र अश्या ठिकाणी वाटप करण्यात करण्यात आले.
यावेळी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष तथा सभापती प. स पोंभुर्णा कु अल्का आत्राम, पंचायत समिती उपसभापती सौ. ज्योती बुरांडे, तालुका महामंत्री भाजपा ईश्वर नैताम, भाजपा नेते अजित मंगळगिरीवार, पंचायत समिती सदस्य विनोद देशमुख, पंचायत समिती सदस्य गंगाधर मडावी, भाजपा पोंभुर्णा शहर अध्यक्ष ऋषी कोटरंगे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अजय मस्के, ता शहर महामंत्री गजानन मड्डपवार, युवा मोर्चा शहर अध्यक्ष विनोद कानमपल्लीवार, भाजपा नेते सुनील कटकमवार, राजू ठाकरे, युवा मोर्चा ता महामंत्री अमोल मोरे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये वाटप करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत