जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏

🙏🏻

उद्घाटन अभावी असलेल्या जिबगांवच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला खासदार अशोक नेते यांनी दिली भेट.

लाखो रुपये खर्च करुन बाधण्यात आलेली आरोग्य केंद्राची ईमारत धुळखात.
कोरोनाच्या संकटात जिबगांव परीसरातील नागरीकांचे बेहाल.
Bhairav Diwase. May 05, 2021

सावली:- तालुक्यातील जिबगांव येथे तिन लाखो रुपये खर्च करुन सुंदर अशी इमारत बाधकाम करण्यात आली. मात्र ते उद्धाटन न झाल्याने सुरु न करणे हा प्रकार योग्य नाही. कोरोनाचा वाढता संक्रमन पाहता येथे कोविड सेंटर सुरु करा अश्या सुचना खासदार अशोक नेते यांनी अधिकार्ऱ्याना दिले. जिबगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची नविन ईमारती बाधकांसाठी सामाजीक कार्यकर्ता राकेश एम गोलेपल्लीवार यांनी अनेक पाठपुरावा केले असता ईमारती बाधकाम करीता जागा व निधी उपलब्ध करुण घेण्यास सामाजिक कार्यकर्ता राकेश गोलेपल्लीवार यांना यश आले व त्यानंतर ईमारत बाधकाम करण्यात आले.
मात्र एक वर्षाचा कालावधी लोटुनही प्रा आरोग्य केंद्र इमारतीच्या उटघाटनाकडे दुर्लक्ष होत असल्याने सावली ब्रम्हपुरी क्षेत्राचे आमदार जिल्हाचे पालकमंत्री विजयभाऊ वडेटीवार यांना पत्र पाठवण्यात आले. त्यांचे सोबत चिमुर गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते, माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, जि. प अध्यक्ष्या संध्या गुरनुले याचे कडे पत्र पाठवण्यात आले असता पत्राची दखल घेत खासदार अशोक नेते यांनी जिबगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इईमारतीला भेट देत पाहणी केली.आ. सुधीर मुनगंटीवार यांनी निवेदनाची तात्काळ दखल घेत सी. ओ आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना पत्र व्यवहार केले. त्यावेळी ग्रा. प सदस्य म गां त समीती चे अध्यक्ष राकेश गोलेपल्लीवार यांनी जिबगाव येथील दुरावलेल्या विकास कामांसाठी खासदाराला निवेदन दिले
निवेदनात


"ईलेक्टीक पोल, रुग्णवाहीका, पंतप्रधान आवास योजनेचे जास्तीस जास्त लाभार्थांना घरकुल व नालीसाठी निधी साठी त.मु.अ.राकेश गोलेपल्लीवार यांनी निवेदनाने केली मागणी

सावली तालुक्यातील जिबगांव हे गाव २००० लोकवस्तीचे आहे परंतु अनेक वर्षापासुन गावाचा विकास दुरावलेला आहे त्यासाठी ग्रामपंचायत सदस्य तथा त.मु.अ. राकेश गोलेपल्लीवार यांनी खास.अशोक नेते यांना निवेदन देऊन दुरावलेल्या विकास कामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली.

यात जिबगाव साठी एक रुग्णवाहीका उपलब्ध करुन देण्यात यावे जेणेकरुन येथील रुग्णांना जिल्हयाच्या ठिकाणी ने आण करता येईल.तसेच गुरुदेव हायस्कुल ते प्राथ.आरोग्य केंद्र मध्ये ५० नवीन ईलेक्टीक पोल मंजुर करणे,बंदीस्त जिमखान्या साठी निधी मंजुर करुन देणे,जिबगाव येथे नाल्या व रोडसाठी निधी साठी उपलब्ध करुन देणे,पंतप्रधान आवास योजनाचे जास्तीस जास्त लाभार्थ्यांना लाभ करुन देणे.प्राथ.आरोग्य केंद्रात एक्स रे मशीन उपलब्ध करुन देणे.यासह ईतर मागण्यांचे निवेदन दिले
यावेळी तहसिलदार पाटील,संवर्ग विकास अधिकारी गावडे,तालुका आरोग्य अधिकारी डा गोबाडे, नायब तह.कांबळे पो. उपनिरीक्षक चिचघरे,प्रभारी सरपंच पुरुषोत्तम चुदरी,सदस्य तथा त.मु.अ. राकेश गोलेपल्लीवार, भक्तदास भोयर,भाजपा अध्यक्ष अविनाश पाल, महामंत्री सतीश बोम्मावार, तसेच जिबगाव अधिकारी देवगडे आदींची उपस्थिती होती....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत