काढोली येथे कोविड 19 विलगीकरण केंद्र सुरू.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- काढोली येथे कोविड 19 विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता गाव स्तरावरच कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना गावातील एखाद्या इमारतीमध्ये सुविधा उपलब्ध करून विलगीकरण केंद्र उभारले पाहिजे. या संकल्पनेतून काढोली येथे phc असल्याने तिथच बाजूला साई विद्यालल्यामध्ये विलगीकरण केंद्राची सुरुवात करण्यात आली.
त्या प्रसंगी जि. प चंद्रपूर चे कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यांनी रुग्णांना दिलासा देत स्वतःची तब्बेतीची माहिती डॉक्टरांना कळवत राहावे. ऑक्सिजन दिवसातून किमान चार वेळा काऊंट केलेच पाहिजे असे समजावून सांगितले. आणि उपस्थित डॉक्टरांना सुद्धा विलगीकृत व्यक्तींकडे सातत्याने लक्ष देण्याचे निर्देश दिले. त्या प्रसंगी सुनील उरकुडे यांनी विलगीकरण व्यक्तिंना नारळ पाणी, फळ वाटप केले.
त्यावेळी राकेश हिंगणे सरपंच काढोली, पुरुषोत्तम लांडे उपसरपंच कोलगाव, सुरेंद्र आवारी सरपंच चार्ली, काढोली phc चे mo डॉ, विपीन ओदेला, डॉ शुभश्री तळवी, अक्षय निब्रॅड व इतर कर्मचारी गावकरी उपस्थित होते.