Click Here...👇👇👇

नवरगाव प्राथ. आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून कोरोना निधीचा होतोय दुरुपयोग?

Bhairav Diwase
स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जोडले बोगस बिले.
Bhairav Diwase. May 10, 2021
सिंदेवाही:- येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नवरगाव PHC मध्ये तात्पुरती कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय अधिकारी या पदावर नेमणूक झाली असून या कंत्राटी कालावधीत कोणत्याही प्रकारची गैरवर्तन किंवा गैरव्यवहार केल्याचे निदर्शनास आल्यास कसलीही पूर्व सूचना न देता तातडीने कामावरून काढून टाकण्यात येईल असे नियुक्ती आदेशात दिशानिर्देशीत केले आहे. असे असतानाही नवरगाव PHC वैद्यकीय अधिकारी या पदाचा कार्यप्रभात असतनांचे कालावधीत राज्य शासनाकडून जवळपास कोविड-19 या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रु.1,00000/-प्राप्त झाले होते. व ही वैद्यकीय सामुग्री तालुक्याच्या ठिकाण मधून खरेदी करण्याचे शासनाचे नियम आहे. पण शासकीय नियम ला तीलांजली देत नवरगाव PHC चा वैद्यकीय अधिकारी यांनी स्वतःचा व आपल्या नातलगांना फायदा पोहोचविण्याच्या हेतूने ही खरेदी तालुक्या बाहेरच्या मेडिकल स्टोअर्स मधून खरेदी केल्याचे बिल दर्शविले आहे.
या निधीतून नवरगाव PHC चा वैद्यकीय अधिकारी यांनी स्वतः चे कुटुंबातील दिराचे नावाने मौजा खांबडा तह, वरोरा जि. चंद्रपूर येथे असलेले अवचट मेडिकल स्टोर्स एजेंशी मधून covid-19च्या निधीतून रु.42772/- चे खरेदी दाखवून बिले जोडली आहेत.अश्या प्रकारे नियमबाह्य खरेदी करून नियत कर्तव्यात कसुर व बेजबादारपणा केला असल्याचे दिसून येईल.प्राप्त झालेल्या निधीचा खर्च करताना शासकीय नियम,आदेश, परिपत्रके याचा विचार करून खरेदी करण्यापूर्वी पारदर्शक पणे व प्रचलित नियमानुसार निविदा प्रक्रिया राबविणे गरजेचे होते. पण नवरगाव PHC वैद्यकीय अधिकारी यांनी स्वतः शासकीय नियम फाट्यावर मारीत स्वतःची मनमानी करून केवळ स्वतःच्या आर्थिक स्वार्थ व फायद्यासाठी शासकीय निधी हडपण्यासाठी वैद्यकीय अधिकारी यांनी बोगस बिले जोडून वरिष्ठ अधिकाऱ्यावर दबाव तंत्राचा वापर केला.

सदर जोडलेली बिले ही नियमबाह्य असल्याने तत्कालीन BDO यांनी बिले मंजूर केलेली नव्हती. एकंदरीत नवरगाव PHC वैद्यकीय अधिकारी यांनी गुन्हेगारी स्वरूपाचा कट करून व स्वतःचे कुटुंबातील नातेवाईकाचा फायदा करण्याचे उद्देशाने व शासनाने त्यांचेवर सोपविलेल्या जबाबदारीचे निर्वहन न करता शासनाचे गैरवाजवी आर्थिक फायदा करण्यासाठी आप संमतीने गुन्हेगारी कृते केली आहेत.
       covid 19 मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र नवरगाव यांच्या कडून वेळीच नागरिकांसाठी उपाय योजना न झाल्याने नवरगाव गावात या रोगाचा बराच संसर्ग वाढलेला आहे असे दिसून येत असल्याने आपल्या कर्तव्यात कसूर करून स्वतः चा आर्थिक फायदा व शासकीय निधी हडपण्यासाठी साथरोग प्रतिबंध कायदा व भारतीय दंड विधान कायद्यातील तरतुदीन्वये सामाजिक कार्यकर्ते FIR रजिष्टर्ड करण्यासाठी सिंदेवाही पोलिसाकडे तक्रार/लेखी रिपोर्ट ही करणार असल्याचे सुत्राांकडून माहिती कळते.
     
      सदर  गावातील नागरिकांना आजाराच्या खाईत लोटणाऱ्या व स्वतःचा स्वार्थ साधणाऱ्या वैद्यकीय अधिकारी यांची  लिखित तक्रार  मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर आणि मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना नवरगाव PHC वैद्यकीय अधिकारी यांना तातडीने कंत्राटी पद्धतीचे कामावरून काढून टाकण्याची विनंती सामाजिक कार्यकर्ते करीत आहे.