Top News

तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला.

वाघाच्या हल्यात महिला जागीच ठार.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गडचिरोली:- गडचिरोली वनविभागातील वनपरिक्षेत्रात गोगाव- महादवाडी गावालगत वाघाच्या हल्ल्यात एक महिला ठार झाल्याची घटना घडली. सदर घटना आज सोमवार सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली. मृतक महिलेच नाव कल्पना दिलीप चुधरी (वय ३५) असे आहे.
गडचिरोली वनपरिक्षेत्रातील गोगाव नियतक्षेत्रात कल्पना दिलीप चूधरी (३५) हे तेंदूपत्ता संकलच्या करतांना त्यावेळी अचानक वाघाने तिच्यावर हल्ला करीत महिलेला ठार केले. आजू बाजूच्या लोकांना माहिती होताच लोकांनी आरडा-ओरडा केला असतांना वाघ जंगलात पसार झाला. माहिती मिळताच घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. परिसरात गस्त वाढविण्यात आली असून गावकऱ्यांना शेतात तसेच गावाला लागून असलेल्या जंगलात न जाण्याच्या सूचना देण्यात आलेले आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने