Top News

वेकोली मार्फत विलगीकरण कक्ष उभारण्याचे कार्य जलद गतीने सुरू.

ब्रिजभूषण पाझारे यांनी विलगीकरण कक्षेची केली पाहणी.
Bhairav Diwase. May 10, 2021
चंद्रपूर:- घुग्घुस-वेकोली परिसरात कोरोना संक्रमण रुग्णाची संख्या दिवसेन दिवस वाढत आहे. वेकोली वणी क्षेत्रातील राजीव रतन रुग्णालयातील आरोग्य सेवक, डॉक्टरर्स कोरोना रुग्णाच्या उपचाराकरिता दिवस रात्र कर्तव्य बजावीत आहे. परिणामी अनेक रुग्ण मृत्युच्या दारातून परत आले आहे. कोरोना परिस्थितीशी लढण्यास वेकोली व्यवस्थापन समितीच्या मोलाचा वाटा आहे.
घुग्घुस परिसरातील नागरिकांना कोरोना संक्रमणातुन बचाव करण्यास माजी अर्थमंत्री व आ.सुधीरभाऊ मूनगंटीवार, माजी केंद्रीय मंत्री हंसराज भैय्या अहिर, माजी जि.प अध्यक्ष देवरावजी भोंगळे यांच्या पाठपुराव्याने सध्या घुग्घुस वेकोली परिसरातील रुग्णासाठी राजीव रतन रुग्णालय वरदानच आहे. त्यातचं वेकोली च्या माध्यमातून घुग्घुस-वणी रोडवर असणारे टेम्पो क्लब येथे कोरोना संक्रमित रुग्णासाठी विलगीकरण कक्ष उभारण्याचे कार्य सुरु आहे. सध्यास्थितीत २५ बेड ची व्यवस्था करण्यात आलेली आहे. शौचालय व्यवस्थापन करण्याचे कार्य शिघ्र गतीने सुरु आहे. लवकरच कार्यपूर्ण होऊन संक्रमित रुग्णासाठी वेकोली ने उभारलेल्या विलगीकरन कक्षेच्या उपयोग येथील नागरिकांना होणार आहे. यामागे वेकोली वणी क्षेत्राचे महाप्रबंधक उदय कावळे साहेब यांचे मोठे योगदान आहे.
माजी समाजकल्याण सभापती तथा जि.प सदस्य ब्रिजभूषण पाझारे यांनी उभारण्यात आलेल्या विलगीकरन कक्षेची पाहणी केली. यावेळी वेकोली उपमहाव्यवस्थापक निर्मल संतोष कुमार, सेफ्टी ऑफिसर सुदर्शन बल्लेवार, नकोडा उपसरपंच मंगेश राजगडकर, ग्रा.प सदस्य रजत तुरानकार यांची उपस्थितीत करण्यात आली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने