💻

💻

म्युकोरमायक्रॅसिस बुरशीजन्य संसर्गाचे चंद्रपुरात १० रुग्ण. Chandrapur

आरोग्य विभागात उडाली खळबळ.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- ‘म्युकोरमायक्रॅसिस’ संसर्गाचे दहा(१०) रुग्ण चंद्रपुरात मिळाल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे . या दहा ही रुग्णावर आरोग्य विभागाचा वतीने विशेष लक्ष दिले जात असून औषधोपचार सुरू आहे. कोरोना उपचारादरम्यान देण्यात येणाऱ्या स्टेरॉईडमुळे रुग्णांना अतिशय गंभीर सामना करावा लागत आहे.
म्युकोरमायक्रॅसिस बुरशीजन्य संसर्गाचे गंभीर परिणाम रुग्णावर होत आहेत.
राज्यभरात अशा रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने निरीक्षण डॉक्टरांनी नोंदविले आहे. चंद्रपुरात म्युकोरमायक्रॅसिस ‘ही चे(१०) दहा रुग्ण मिळाले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर निवृत्ती राठोड यांनी दिली. या सर्व (१०) दहा ही रुग्णावर औषध उपचार सुरू असून त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगितले. शहरातील एका सिटी स्कॅन सेंटर मध्ये स्कॅन करतांना या रुग्णांमध्ये हा आजार मिळून आला आहे. मात्र येत्या काळात या रुग्णांची संख्या तथा मृत्यू वाढण्याची शक्‍यताही त्यांनी वर्तविली आहे. विशेष म्हणजे या रोगावरील प्रतिबंधात्मक इंजेक्शन महागडे आहे. शस्त्रक्रिये चा खर्च देखील सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत