बल्लारपूर विधानसभा भाजयुमो सोशल मीडिया प्रमुख पदी पियुष मेश्राम यांची निवड.

जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केले अभिनंदन.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
बल्लारपूर:-भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर जिल्हा कडून बल्लारपूर विधानसभा क्षेत्राकरीता सोशल मीडिया प्रमुख म्हणून श्री. पियुष मेश्राम यांची निवड करण्यात आली.

या निवडीबद्दल राज्याचे माजी अर्थमंत्री तथा लोकलेखा समिती प्रमुख आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार व माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजभैय्या अहीर यांनी अभिनंदन करत पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यासोबतचं जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, जि. प. अध्यक्षा सौ. संध्याताई गुरनुले, महीला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा कु. अल्काताई आत्राम तसेच कामगार आघाडीचे प्रदेश महामंत्री अजय दुबे, भारतीय जनता पार्टीचे ट्रान्सपोर्ट आघाडी जिल्हा संयोजक सविंदर सिंग दारीजी, ट्रान्सपोर्ट आघाडी तालुका अध्यक्ष गुलशनजी शर्मा, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष मिथिलेश पांडे, भाजयुमो जिल्हा सोशल मीडिया संयोजक आदित्य शिंगाडे, विद्यार्थी आघाडी जिल्हा महामंत्री प्रतिक बारसागडे, भाजपा सचिव मनीष रामलीलाजी, युवा कार्यकर्ता प्रमोद दुबेजी, साई सरकार ग्रुप प्रमुख मोहित डोंगरे, मोला निषाद, रिंकू गुप्ता यांसह आदिंनीही श्री. पियूष मेश्राम यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने