Top News

रासेयो स्वयंसेवकांकडून एक हात मदतीचा.



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- युवकांनी युवा शक्तीचा वापर सामाजिक कार्यातून जाणीवजागृती निर्माण करण्याकरिता व अडचणीच्या वेळेत समाजातील दुर्बल घटकांच्या मदतीसाठी धावून जाण्याकरिता एकत्र येत स्वराज्य आधार फाउंडेशन ची राजुरा येथे स्थापना करून या स्वयंसेवी संस्थेमार्फत कोरोना महामारीच्या काळात गरजूंना जेवण, अन्नधान्य, भाजीपाला वाटप करण्यात येत आहे, यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आमच्या महाविद्यालयातील स्वयंसेवक दीपक राजूरकर आणि बालाजी ताजणे हे सुद्धा सक्रिय सहभागातून या कार्यात कार्यरत आहेत.
या महामारी च्या काळात लॉकडाऊनमुळे अनेक कुटुंब उघड्यावर आलेली आहे, रोजगार गेलेले आहेत, अनेक कुटुंबाना दोन वेळच्या जेवणाची सुद्धा भ्रांत आहे त्यामुळे कुणीही अन्नवाचून उपाशी राहू नये, ही संकल्पना घेऊन स्वराज्य आधार फाउंडेशन तर्फे राजुरा येथील दुर्बल व गरजूंना अन्नधान्य, भाजीपाला, जेवण वाटप करण्यात येत आहे.

यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेतून सामाजिक कार्याची आवड निर्माण झालेल्या श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा जिल्हा चंद्रपूर येथील दिपक राजूरकर व बालाजी ताजने या स्वयंसेवकांनी स्वयंप्रेरणेने राजुरा येथील गरजूंना अन्न वाटप करत आहेत, या दोन्ही स्वयंसेवकांनी राष्ट्रीय स्तरावरील एकात्मता शिबीर हजारीबाग (झारखंड) तसेच राज्यस्तरीय शिबिरात सहभागी होऊन महाविद्यालयाचे, विद्यापीठाचे नावलौकिक केले आहे‌
दोन्ही स्वयंसेवकांच्या या कार्याचे तसेच स्वराज्य आधार फाउंडेशन च्या सर्व सदस्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. वारकड, तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास बलकी यांनी कौतुक करून अभिनंदन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने