रामपूर येथे लवकरात लवकर 44 वर्षे वरील नागरिकांच लसीकरण सुरू होणार.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- रामपूर येथे 44 वर्षे वरील नागरिकांना कोविड लसीकरणाची सोय उपलब्ध करून द्यावी या साठी संकल्प फाउंडेशन रामपूर तर्फे ता. वैद्यकीय अधिकारी राजुरा यांना 2 दिवसा अगोदर निवेदना मार्फत मागणी केली होती निवेदनाची दखल घेत ता. आरोग्य अधिकारी तसेच डॉ. विपीन कुमार ओडेला यांनी परिस्थिती ची पाहणी करूण लवकरच लसीकरण सुरू होणार अस म्हटल या सर्वा साठी संकल्प फाउंडेशन रामपूर चे सुरज गव्हाने, उज्वल भाऊ शेंडे, ओमप्रकाश काळे, दिनेश वैरागडे, गितेश कौरासे, शुभम बोबडे, अक्षय डकरे, दिपक झाडे, यांनी सतत पाठपुरावा केला.