ॲड. मधुकरराव भागवत यांचे स्मृतीप्रित्यर्थ ॲड. रविंद्रजी भागवत यांचे हस्ते हंसराज अहीर यांचे उपस्थितीत पंत हाॅस्पीटलला व्हेंटीलेटर भेट.

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- कोरोना संकट काळात कोविड-19 हाॅस्पीटल मान्यतेत पंत हाॅस्पीटल चे सेवाकार्य संक्रमितांना योग्य निदान व उपचार कार्य करणारे पंत हाॅस्पीटलला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय स्तरावर त्याकाळात गुजरातचे प्रचारक तथा पूर्व मा. विभाग संघचालक आदरणीय स्व. मधुकरराव भागवत यांचे स्मृती प्रित्यर्थ ॲड. रविंद्रजी भागवत यांचे हस्ते तथा पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचे उपस्थितीत ना. नितिनजी गडकरी, केंद्रीय मंत्री यांच्या सहकार्याने अत्याधुनीक व्हेंटीलेटर भेट देवून संक्रमितांना सेवा मिळेल.

या भावनेतून तथा डाॅ. प्रविण पंत यांचे स्वाथ्य सेवेची दखल घेवून स्व. मधुकरराव भागवतांचे जिवनाचे हेच उद्दीष्ट असल्याने तथा त्यांचेसह अनेक वर्ष सहकारी म्हणुन कार्य करणारे ॲड. स्व. बाबाजी पंत यांचे नातू डाॅ. प्रविण पंत यांचे हाॅस्पीटलला ही भेट देतांना रूग्णसेवा करीत मला फार आनेद होत असल्याचे मा. नगर संघचालक ॲड. रविजी भागवत यांनी या प्रसंगी उद्गार काढले.