१९ वर्षीय तरुणाची गळफास लावून आत्महत्या.

Bhairav Diwase
आत्महत्येचे कारण मात्र गुलदस्त्यात.
Bhairav Diwase. June 05, 2021
सिंदेवाही:- चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तहसिल अंतर्गत येत असलेल्या नवरगांव समिप असलेल्या काेकेवाडा पेंढरी येथील एका तरुण शुक्रवारला दुपारी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली.
या घटनेतील मृतकाचे नांव अंकुश मगरे (वय १९ वर्ष) असुन त्याचे आत्महत्येचे नेमके कारण कळु शकले नाही. अंकुशनी आत्महत्या केली त्यावेळी कुटुंबातील काेणीही व्यक्ती घरी नसल्याचे कळते. या प्रकरणाची नवरगाव पाेलिस अधिक चाैकशी करीत आहे.