आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मानोली येथे ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटर उपलब्ध.

Bhairav Diwase
आशावर्कर यांना ऑक्सीमिटर व गावातील नागरिकांना मास्कचे वाटप.

कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे यांचा हस्ते वाटप.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- कोरोना महामारीच्या मागील महिण्यात जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता भासुन अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. याची गंभीर दखल घेत माजी पालकमंञी आ.सुधिरभाऊनी मानोली प्रा.आ. केंद्रला ऑक्सिजन Constrator देण्यात आले. तसेच कोरोना प्रादुर्भाव होऊ नये यासाठी नियमितपणे मास्कचा वापर करणे, दोन व्यक्तीमध्ये संपर्काच्या वेळी सुरक्षित अंतर राखणे, नियमित हात स्वच्छ ठेवणे यासोबतच कोरोना लसिकरणाबाबत ग्रामीण भागात असणारे गैरसमज दूर करण्यासाठी सारासार मार्गदर्शन करून कोरोनाचा धोका टाळण्यासाठी लसीकरणाचे महत्व सुनिलभाऊ ऊरकुडे यांनी उपस्थित नागरिकांना पटवून दिले.
यावेळी गावचे नानाजी पा.आदे, माजी जी.प. सदस्य, सौ.लताताई उईके सरपंच नोकारी खु., वामन तुरानकर उपसरपंच नोकारी( खु), अरविंद दुर्गे उपसरपंच जामनी, पुष्पकुमार भगत पो.पा.जामनी, सुचीता जीचकर ए.एन.एम मानोली, गेडाम सीस्टर, दिनेश आदे, शिवाजी झोडे  सौ.पौर्णीमाताई भगत, छायाताई जोगदंडे, सुजाता रामटेके, संगीताताई ठाकरे  व ग्रामस्त उपस्थित होते.