विविध योजनेतून विकास कामाकरिता निधी उपलब्ध करून द्या- सर्वानंद वाघमारे
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- राजुरालगत असलेल्या बामणवाडा ग्राम पचायत येथील स्मशानभूमी दैनावस्था झालेली आहे. बामणवाडा येथील लोकसंख्या दिवशेन दिवस वाढीव, नवीन वस्त्या वाढत असल्यामुडे लोकसंख्येत भर पडत आहे. सादर स्मशानभूमी वरील अंतीमसंस्कार सदनिका टिनाच्या शेडची असल्यामुळे ती जीर्ण झालेली आहे व वादळ वाऱ्यामूळे सदनिकेवरचे टिनाचे पत्रे उडून गेले आहे व जे टिनाचे पत्रे आहे ते सुद्धा जीर्ण होऊन भोके पडलेले व फाटलेले आहे. त्यामुळे पावसामध्ये एखाद्या मैयत व्यक्तीचा अंतीमसंस्कार करणे जिकिरीचे जात आहे. सादर स्मशन भूमी मधील बोरवेल कित्तेक दिवसापासून बंद आहे. मैयत व्यक्तीची शोक सभा घेण्यासाठी सदनिका नाही उन्हाळ्यात सावलीत उभे रहातो म्हटलं तर तिथे झाडे सुद्धा नाही.
म्हणून स्माशंभूमी मध्ये नवीन अग्निदहन सदनिका,शोकसभा सदनिका,पाण्यासाठी बोरवेल दुरुस्त वाल कंपाऊंड ,स्माशंभूमीकडे जाणाऱ्या रोड व तलावाचे सैदर्यीकरन इत्यादी विकास कामे करण्यासाठी 30 लाखाचा निधी विविध योजनेतून मिळण्यासाठी पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार खासदार बाळू धानोरकर ,मा. आमदार सुभाष धोटे यांचेकडे विद्यमान ग्राम पंचायत सदस्य तथा माजी सरपंच श्री सर्वानंद वाघमारे यांनी मागणी केली आहे. सादर मोक्षधाम मध्ये सौंदर्यीकरण व वृक्ष लावण्याचे काम श्री सर्वानंद वाघमारे, व वृक्षप्रेमी श्री भास्कर करमनकर करीत आहे.