ग्रामपंचायत आसापुरकडुन लिंगणडोह येथिल अंगणवाडी केंद्रावर तक्रार निवेदन दाखल. Complaint

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनील राठोड, जिवती
जिवती:- लिंगणडोह येथिल अंगणवाडीत सरकारी माल पोषण आहार आलेला अंगणवाडी बिल्डिंग असताना सुद्धा अंगणवाडी सेविका सौ इदुंताई बाबु पवार व मदतनीस सौ जनाबाई शिवराम आडे यांनी येणाऱ्या सरकारी मालाला आपल्या घरीच ठेवून पोषण आहार स्वतः खात असल्याचे तक्रार निवेदन आसापुर ग्रामपंचायतचे सरपंच सौ विमलताई कन्नाके व उपसरपंच श्नी वामन पवार यांनी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार श्नी सुभाष धोटे संवर्ग विकास अधिकारी राजुरा व गडचांदुर पोलिस स्टेशनला माहीतीस सादर करण्यात आले आहे.


यात लिंगणडोह येथिल अंगणवाडी सेविका अंगणवाडी केंद्रात रोज येत नसते तसेच गावातील प्रमुखांनी विचारणा केल्यावर गावातुन काही इसमाकडुन धमकी मिळतात करीता ग्रा.प. आसापुरचे उपसरपंच श्नी वामन पवार यांनी अंगणवाडीस विचारणा केली असता काही इसमांनी मुजुरी करीत तु कोण आहे सांगणारा अस्या उद्धटपणे बोलत राजकीय दबाव व गावातील दहशत निर्माण करत तरी मा.सवर्ग विकास अधिकारी राजुरा यांनी तत्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी करीता आसापुर ग्रामपंचायत चे सरपंच उपसरपंच अंगणवाडी केंद्रावर तक्रार निवेदन दाखल केला आहे.