Top News

कंत्राटदारांच्या नियोजन शून्य धोरणामुळे रस्ता गेला वाहून.

पोंभुर्णा-मुल मार्गावरील पहिल्याच पावसात रस्त्या उखडला.

संबंधित विभागाचेही अक्षम्य दुर्लक्ष.

जिव मुठीत घेऊन करावा लागतोय जीवघेणा प्रवास.

संबंधित प्रकरणाची चौकशी करावी व दोषी कंत्राटदारावर कार्यवाहीची नागरिकांची मागणी.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- चंद्रपूर व मुल ला जोडणाऱ्या पोंभूर्ण्याच्या मुख्य मार्गावरील आयटिआय जवळ नविन पुलीयाचे काम सुरू आहे. संबंधित कंत्राटदारानी लोकांना ये-जा करण्यासाठी नाल्यामधूनच दुसरा कच्चा मार्ग तयार करून दिला.
   मात्र कंत्राटदारांच्या नियोजन शून्य धोरणामुळे पहिल्या पावसाच्या पाण्याने तो रस्ता वाहून गेला. मुख्य रस्ता वाहून गेल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांची मोठी पंचायत झाली. सर्व वाहणे जिथच्या तिथे थांबल्याने वाहनांची रांगच रांग लागली होती.शिवाय मंगळवार आठवडी बाजार असल्याने गाव खेळ्यातील येणाऱ्या लोकांची फार मोठी पंचायत झाली. आरोग्यासंदर्भात अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. तर यादरम्यान गरोदर माता व जेष्ठ नागरिकांनी जिव मुठीत घेऊन पाण्यातून वाट काढत होते.
       
       शासकीय कर्मचाऱ्यांनाही मोठी पंचायत झाली. कंत्राटदारांच्या गलथान कारभारामुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता लोक जीव धोक्यात घालून पाण्यातून वाट काढत होते.  एवढी जीव घेणी परिस्थीती असतांनाही संबंधित कंत्राटदारांकडून कोणत्याही प्रकारचे योग्य उपाययोजना करण्यात आले नव्हते. याकडे संबंधित विभागाचेही अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. 24 तास उलटून गेले तरीही कंत्राटदारांनी यांच्या कडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. आपत्कालीन परिस्थितीत या रस्त्यानी जायच कस? असा प्रश्न जनतेकडून उपस्थित होत आहे. याबाबत संबंधित प्रकरणाची चौकशी करावी व दोषी कंत्राटदारावर कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने