💻

💻

आटाचक्की सुरु करताना विजेजा शॉक लागून इसमाचा मृत्यू.


(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रितेश एस. आसमवार, चामोर्शी
चामोर्शी:- आटाचक्की सुरु करताना विजेजा शॉक बसल्याने मुधोली चक न ०२ येथील देवाजी गोविंदा सूरकर मुधोली चक न ०२ येथील मुळचे रहिवासी होते. ते पायाने अपंग असल्याने त्यांना शेतीचे काम व इतर काम जमत नसल्याने आपल्या कुटुंबातील उदरनिर्वाह करिता आपल्या परीवारातील एक मुलगा व त्यांची पत्नी यांना घेऊन आटा चक्की साठी बँक ऑफ इंडिया येनापूर यांचे कडून ६० हजार लोन घेऊन त्यांनी आपल्या कुटुंबीयांना पालन पोषणा करिता गावात आटाचक्की लावली व त्या आटाचक्कीच्या भरोशावर त्यांने आपल्या परिवाराचे पालन पोषण चालत होते.
परतुं या दिव्यांग व्यक्तीच्या संसारला काळाने घात केला व ९ जून च्या सकाळच्या सुमारास देवाजी गोविंदा सूरकर यांना आटाचक्की सुरु करताना विजेजा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. सदर इसम हे अतिशय प्रामणिक व अपंग असून सुद्धा त्यांचा समजात कामाचा वेगळा आदर होता. त्यामुळे समजात व त्यांचा परिवारात संकटाचे आभाळ कोसळले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत