🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

जावयाने केली सासऱ्याची गोळ्या झाडून हत्या.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
अहेरी:- अहेरी येथील धर्मपुरी वॉर्डात जावयाने सासऱ्याची बंदूकीतून गोळी झाडून हत्या केल्याची घटना काल रात्रौ 10 च्या सुमारास घडली आहे. मृतक सासऱ्याचे नाव मारोती मत्तामी रा. खोरडा ता. चामोर्शी असे आहे. तर आरोपी जावयाचे नाव मनोज गावडे असे आहे.
मनोज गावडे हे पोलीस दलात कार्यरत आहेत. काल बुधवारी मारोती मत्तामी हे अहेरी येथे आपल्या मुलीला भेटायला आले होते. त्याची मुलगी व जावयात कौटुंबिक वाद सुरू होता. तो सोडविण्यासाठी मारोती मत्तामी अहेरी येथील धर्मपुरी वॉर्डात मनोज गावडे यांच्या घरी आले होते.
काल रात्रौ 10 च्या सुमारास जावई आणि सासऱ्यात या विषयावरून वाद झाला असताना वाद विकोपास गेला. रागाच्या भरात मनोज ने आपल्या कडे असलेल्या बंदुकीतून गोळ्या झाडल्या. यात सासऱ्याचा जागीच मृत्यू झाला.
गोळ्याचा आवाज येताच आजूबाजूचे लोक जागे झाले त्यांनी काय घडले याची माहिती घेतली असता जावयाने सासऱ्यावर गोळी झाडली असे समोर आले.
लागलीच याची माहिती अहेरी पोलीस स्टेशन ला देण्यात आली.आरोपी मनोज गावडे ला ताब्यात घेण्यात आले आहे. घटनेचा पंचनामा आज गुरुवारी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अहेरीचे पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.या घटनेचा अधिक तपास अहेरी पोलीस करत आहेत.